शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठि आ. बालाजी किन्हिकर व ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी घेतली मुखमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट....
मुंबई सत्यप्रकाश न्यूज
आझाद मैदानआझाद मैदानं सुरू असलेल्या आंदोलनात ज्या मागण्या शिक्षक बांधवांनी केल्या होत्या त्या पूर्ण करून घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामनदादा म्हात्रे व महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी काल रात्री उशिरा भेट घेतली, शाळांना अनुदान मिळावे म्हणून अंबरनाथ विधानसभा आमदार डॉक्टर बालाजी किनीकर साहेब सातत्याने पाठपुरावा करत आहेत*
खालील विषयावर पुन्हा स्पष्ट चर्चा झाली
1) अघोषित शाळांचा व त्रुटी पूर्तता शाळांचा पूर्वी विषय क्लियर झाला होता, त्यावर शिक्कामोर्तब करून घेतला, ठरल्याप्रमाणे 15 नोव्हेंबरला याद्या जाहीर करणार व अनुदान देणार
2) अंशतः अनुदानित शाळांना पुढील वाढीव टप्पा देणार तेही 15 नोव्हेंबर पर्यंत प्रयत्न करणार
3) जूनियर कॉलेज वाढीव पदे, सेवा संरक्षण यांचा विषय नंतर घेतला जाईल असे त्यांनी सांगितले
4) जुनी पेन्शन लागू करण्यासाठी सर्व माहिती अधिकाऱ्यांकडून घेऊन स्पेशल मीटिंग त्यासाठी लावली जाणार असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले अशी माहिती
विष्णू विशे संपर्कप्रमुख ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक सेना यांनी दिली.
Tags:
शैक्षणिक