नंदुरबार येथील 33 वी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा अंतीम टप्प्यात........

नंदुरबार येथील 33 वी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा अंतीम टप्प्यात..........
     नंदूरबार सत्यप्रकाश न्यूज 
    पोलीस मुख्यालय, नंदुरबार येथील मैदानावर दिनांक 31 ऑक्टोंबर 2022 रोजी पासून सुरु असलेली 33 वी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा अंतीम टप्पयात आली असून दिनांक 3 नोव्हेंबर 2022 रोजी दिवसभरात पुरुष आणि महिला गटातील वैयक्तिक व सांघीक खेळाच्या प्रकारांमध्ये चुरस निर्माण झालेली पाहायला मिळाली. पुरुष आणि महिला गटातील वैयक्तिक व सांघीक खेळाच्या क्रोडा प्रकारात परिक्षेत्रातील सर्व संघांमध्ये सर्व साधारण विजेतेपद कोणत्या जिल्हा पोलीस दलाकडे जाते याची उत्सुकता निर्माण झाली आहे. दिनांक 3 नोव्हेंबर 2022 गुरुवारी नंदुरबार शहरातील क्रीडा संकुलाच्या मैदानावर पार पडलेल्या कुस्ती या क्रीडा प्रकारात 50 KG गटात नंदुरबारचं निवावाई वाघमोडे प्रथम तर अहमदनगरचे शितल लोखंडे द्वितीय, 53 KG गटात नंदुरबारचे दिपाली सावकर प्रथम व अहमदनगरचे तारा चंदे द्वितीय, 55 KG गटात धुळ्याचे दिपाली सोनवणे प्रथम, नंदुरबारचे सुनिता मोरे द्वितीय, 57 KG गटात नाशिक शहराचे प्रियंका मोरे प्रथम, 59 KG गटात नाशिक ग्रामीणचे मनिषा हांडे प्रथम, नाशिक शहराचे शाहवेन बागवान द्वितीय, 62 KG गटात राजश्री शिंदे प्रथम, नंदुरबारचे मनाली चौधरी द्वितीय, 65 KG गटात नाशिक शहराचे पूजा शिंदे प्रथम, नंदुरबारचे कोमल शिंदे द्वितीय, 68 KG गटात धुळ्याचे पुजा सांगळे प्रथम, नाशिक शहराचे ताई भोये द्वितीय, 72 KG गटात नाशिक शहराचे मवुरी गांगुर्डे प्रथम तर नंदुरबारचे मोगरा पाडवी द्वितीय स्थानावर राहिले.
ज्युडो कराटे या क्रीडा प्रकारात पुरुषांच्या 60 Kg वजन गटात धुळ्याचा अक्षय उगले प्रथम, नाशिक ग्रामीणचे संतोष सारस द्वितीय, 66 Kg वजन गटात धुळ्याचे राकेश मोरे प्रथम, नाशिक ग्रामीणचे संदीप बनकर द्वितीय, 73 Kg वजन गटात धुळ्याचे मधुर चौधरी प्रथम, नाशिक शहरचे सागर चिंचोले द्वितीय, 81 Kg वजन गटात धुळ्याचे सचिन पाटील प्रथम, नाशिक ग्रामीणचे संदीप निकुंभ द्वितीय, 90 Kg वजन गटात अहमदनगरचे शेखर वाघ प्रथम, नाशिक ग्रामीणचे प्रवीण भोईर द्वितीय, 100 Kg वजन गटात अहमदनगरचे सारंग वाघ प्रथम, नाशिक ग्रामीणचे विकास शिंदे द्वितीय, 100 + Kg वजन गटात नाशिक ग्रामीणचे प्रमोद आकाड प्रथम, अहमदनगरचे अमोल गाडे द्वितीय क्रमांकावर राहिले.तसेच ज्युदो या क्रीडा प्रकारात 70 KG वजन महिलांच्या गटात नाशिक शहरचे माधुरी गांगुर्ड प्रथम, अहमदनगरचे कविता साठे द्वितीय, 77 KG वजन महिलांच्या गटात नाशिक शहरचं सुनिता सावळे प्रथम अहमदनगरचं छाया गायकवाड द्वितीय, 70 KG वजन महिलांच्या गटात नाशिक शहरचं माधुरी गांगुर्डे प्रथम, अहमदनगरचे कविता साठे द्वितीय क्रमांक पटकविला आहे. ज्युदो या क्रीडा प्रकारात महिला व पुरुषांच्या गटात नाशिक शहर 20 गुण घेवून प्रथम क्रमांक, अहमदनगर 16 गुण घेवून द्वितीय व नंदुरबार 13 गुण घेवून तिसऱ्या क्रमांकावर राहिलेत.
बास्केटबॉल या क्रीडा प्रकारात महिलांच्या गटात नाशिक शहर व नाशिक ग्रामीण यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. नंदुरबारच्या संघाने धुळेच्या संघावर, अहमदनगरच्या संघाने जळगांवच्या संघावर विजय मिळविला. तसेच पुरुषांच्या गटात नाशिक शहरने नाशिक ग्रामीणच्या संघावर धुळ्याच्या संघाने नंदुरबारच्या संघावर तर अहमदनगरच्या संघानं जळगांवच्या संघावर विजय मिळविला.
फुटबॉलच्या सामन्यांमध्ये नाशिक ग्रामीणच्या संघाने अहमदनगरच्या संघाचा धुळ्याचा संघाने नाशिक शहरचा, जळगांवच्या संघाने नंदुरबारच्या संघाचा पराभव केला. व्हॉलीबॉलच्या पुरुषांच्या सामन्यामध्ये नाशिक शहराने अहमदनगरच्या संघाचा, नंदुरबारच्या संघाने नाशिक ग्रामीणच्या संघाचा, जळगांवच्या संघाने धुळ्याचा संघाचा पराभव केला. दिनांक 31 ऑक्टोंबर 2022 से दिनांक 3 नोव्हेंबर 2022 रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यांमधील पात्र असलेले संघ दिनांक 4 नोव्हेंबर 2022 रोजी अंतीम सामने खेळविले जाणार असून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी. जी. शेखर पाटील, नाशिक शहराचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे हे देखील उपस्थितीत राहणार आहेत. तरी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी व कांडा प्रेमीनी दिनांक 4 नोव्हेंबर 2022 रोजी पोलीस कवायत मैदानावर होणान्या 33 वी नाशिक परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेच्या समारोप समारंभप्रसंगी उपस्थित राहावे असे आवाहन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post