नवापूर-सत्यप्रकाश न्युज विद्यार्थ्यानी काॅपीमुक्त अभियानात सहभागी होऊन परिक्षा देण्याचे आवाहन नाशिक विभागीय शिक्षण बोर्डाचे नवनियुक्त सहसचिव डाॅ.मच्छिंद्र कदम यांनी नुकत्याच झालेलया विभागीय भरारी पथकाच्या सभेत केले.
मार्च व एप्रिल मध्ये झालेल्या परिक्षेत जे अनुत्तीर्ण झाले होते अशा विद्यार्थ्याची पुर्नपरिक्षा जुलै मध्ये होणार असून या परिक्षेसाठि दिनांक 13 जुलै रोजी सर्व केंद्र संचालकांची बैठक घेण्यात आली होती
या बैठकीत नाशिक धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे केंद्राचे केंद्र 65 यात 10 वी चे 36 तर 12 वी 29 केंद्र संचालक (मुख्याध्यापक/ उप मुख्याध्यापक/ प्राचार्य) उपस्थित होते.
तसेच 14 जुलै रोजी 4 ही जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांची भरारी पथक सभा झाली या सभेत नाशिक विभागाचे नंदुरबार ,धुळे, जळगांव ,नाशिक या जिल्ह्यातील भरारी पथकाची सभा नाहीत विभागीय बोर्डाचे सहसचिव डाॅ.मच्छिंद्र कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली यावेळेस ते बोलत होते.
आपल्या मनोगतात पुढे म्हणाले कि सध्या राज्यात काॅपीमुक्त अभियान सुरू असून या अभियानात सहभाग नोंदवून कॉपीमुक्त परिक्षा द्यावी
यासाठी शिक्षण उपसंचालक डाॅ. बी. बी. चव्हाण, नंदुरबार शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे, धुळे शिक्षणाधिकारी मोहन देसले ,नाशिक उपशिक्षणाधिकारी श्री अहिरे जळगाव उपशिक्षणाधिकारी उपस्थित होते.
या साठि 15 जुलै रोजी सर्व परिक्षक(गटशिक्षणाधिकारी / शिक्षण विस्तार अधिकारी यांची बैठक व परीक्षा गोपनीय साहित्य वितरण केले गेले असून परिक्षेची तयारी मंडळाने पूर्ण केली असून विद्यार्थ्यांनि कॉपी मुक्त अभियान नुसार कॉपी मुक्त परीक्षा द्यावी ,
अशी माहिती मंडळाचे सहसचिव डॉ मच्छिंद्र कदम यांनी दिली आहे