नवापूर शहरातील ऑनलाइन फसवणुकीचे तीन लाख मिळाले परत
नवापूर सत्यप्रकाशन्यूज
:सध्या ऑनलाईन फसवणूक होत असून शहरात अशी मेसेज बर्याच नागरिकांना येत असून कित्येकांचे पैसे देखील गेले आहेत मात्र गेल्या 13 दिवसापूर्वी झालेल्या 2.98 लाखाची फसवणूकिची लागलीच तक्रार केल्यानंतर सदर रक्कम परत मिळविण्यासाठी सायबर सेल ला यश मिळाले असून पैसे मिळाल्याचा नवापूर शहरातील नागरिकांकडून सायबर सेल कर्मचाऱ्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.
सविस्तर वृत्त असे की वीज बिल भरण्याच्या नावाने मोबाइल हॅक करून २ लाख ९८ हजार रुपये बँक खात्यातून लांबविल्याचा प्रकार नवापुरात घडला होता. सायबर सेल व बँकेच्या समन्वयातून तातडीने कारवाई करीत फसवणूक झालेल्या व्यक्तीचे २ लाख ९८ हजार रुपये परत मिळविण्यात यश आले.
नवापूर शहरातील स्टॅम्प वेंडर तथा एलआयसी एजंट विकास शहा यांना १८ ऑक्टोबर रोजी इलेक्ट्रिक सिटी नाव असलेल्या नंबर वरून फोन आला आणि तुमचे लाईट बिलाचे अकरा रुपये बाकी आहे, ते त्वरित भरा असे सांगितले. या संभाषणात त्यांच्याकडून काही माहिती काढून घेण्यात आली. ती संधी साधत सायबर भामट्याने त्यांचा मोबाइल हॅक करून त्यांच्या बँक खात्यातून २ लाख ९८ हजार रुपये काढून घेतले होते. फसवणूक झालेले विकास शाह यांनी तत्काळ बँक व पोलिसांना संपर्क साधला. सायबर सेल
पोलिसांच्या सायबर सेलमधील कर्मचारी पंकज महाले, कन्हैया पाटील, हितेश पाटील या पथकाने ही कारवाई केली. तक्रारदार यांनी पोलीस अधीक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.
नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर येणाऱ्या व्यवहाराच्या सूचनांकडे नेहमी लक्ष द्या.
एवढे मात्र करा
■ तुमच्या ऑनलाइन बैंकिंग खात्यांसाठी कठीण पासवर्ड वापरा आणि तो वेळोवेळी बदला.
■ ऑनलाइन आर्थिक फसवणुकीला बळी पडल्यास १५५२६० वर कॉल करा आणि तत्काळ तक्रार नोंदवा.
ऑनलाइन फ्रॉड होताच तत्काळ बैंक अधिकारी व सायबर सेल विभागाशी संपर्क करावा.
Tags:
क्राईम