अहमदनगर येथील नोंदणीकृत टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा १५ जुलै २०२३ रोजी संस्थेचे अध्यक्ष श्री किशोर गांधी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
प्रारंभी दीप प्रज्वलन करून अहवाल सालात संस्थेचे उपाध्यक्ष सुनील फळे, संस्थेचे पदाधिकारी श्री सुनील सरोदे यांच्या मातोश्री तसेच ज्ञात अज्ञात मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी व्यासपीठावर श्री किशोर गांधी, सुनील कराळे, प्रसाद किंबहुणे,
अंबादास गाजुल, सोहन बरमेचा आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सभेचे प्रास्तविक व सूत्र संचलन संस्थेचे उपाध्यक्ष श्री नितीनजी डोंगरे यांनी केले.
तर , सचिव प्रसाद किंबहुणे यांनी, सभेपुढील विषय तसेच इतिवृत्ताचे वाचन केले, सभेपुढील सर्व विषयास सदस्यांनी मंजुरी दिली.
या प्रसंगी संस्थेच्या सभासदांसाठी ऍड.पुरुषोत्तम रोहीडा यांनी,आयकर कायदा कलम १४८ नोटीस संदर्भातील सखोल माहिती दिली.
तर जेष्ठ कर सल्लागार श्री सोमनाथ सोनवणे सर यांनी सहकार कायद्यातील लेखापरीक्षण करीत असताना लेखापरिक्षकांची जबाबदारी व घ्यावयाची काळजी या विषयावर उत्तम माहिती सभासदांना दिली. नगर येथील सीए सागर रोहिडा यांनी वस्तू व सेवा कर (GST) कायद्यामधील नवीन बदल व तरतुदी समजावून सांगताना,उपस्थितांच्या शंकांचे समाधान केले.
अहवाल वर्षात संस्थेच्या नवीन सभासदांचे सत्कार करण्यात आले, या प्रसंगी सदस्यांनी देखील त्यांचा स्व-परिचय करुन दिला.
या वार्षिक सभेमध्ये, संस्थेच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला.
चि. ओम निलेश चोरबेले इ.१० वी मध्ये ९७%, कु.शर्वरी अंबादास गाजूल इ. १२वी मध्ये ७०%, चि.सार्थक सोहनलाल बरमेचा-बीकॉम परीक्षेत ८५%, श्री महावीर विजयकुमार भंडारी सीए उत्तीर्ण झाल्याबद्दल, तर कु. तानिया पुरुषोत्तम रोहिडा- इ.१० वी मध्ये ९२% मार्क्स मिळविल्याबद्दल, या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन,यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री सोहन बरमेचा यांनी केले.
आजच्या बैठकीत संस्थेने हाती घेतलेल्या नूतन वर्षामधील उपक्रमाबाबत माहिती देताना, राष्ट्रीय पातळीवरील ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्स यांच्या सोबत आणि आपल्या संस्थेमार्फत शिर्डी येथे येत्या २१ व २२ ऑगस्ट २०२३ रोजी "नॅशनल लेव्हल टॅक्स कॉन्फरन्स" आयोजित करण्यात आलेली असून, या निमित्ताने आपल्या संस्थेला हा मोठा बहुमान मिळालेला असल्याचे नमूद करून, अहमदनगर जिल्ह्यातील सर्व कर सल्लागारांनी या कॉन्फरन्स साठी त्वरित नावनोंदणी करण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री किशोर गांधी व उपाध्यक्ष श्री नितिन डोंगरे यांनी केले.
संस्थेचे खजिनदार श्री अंबादास गाजूल यांनी आभार प्रदर्शन केले.या सभेसाठी ऍड.निलेश चोरबेले, श्री करण गांधी, आनंदजी लहामगे,अमित पितळे, श्री नरेंद्र बागडे, आशिष मुथा,हेमेन्द्र भंडारी, अशोक धायगुडे,संजय ननावरे, दत्ता होले, अविनाश खेडेकर, स्वप्नील भळगट, ऍड.प्रदीपकुमार वावरे, प्रशांत चोरडिया तसेच अहमदनगर जिल्ह्यातील बहुसंख्य कर सल्लागार सदस्य उपस्थित होते
सदरची वार्षिक सर्व.सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
शेवटी राष्ट्रगीत होऊन या सभेचा समारोप करण्यात आला.
Tags:
करविषयक