नवापूर तालुका गणित महामंडळाच्या अध्यक्षपदी दर्शन कुमार अग्रवाल यांची निवड

नवापूर सत्यप्रकाश न्यूज              गणितीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ यांच्यावतीने नवापूर तालुका गणित अध्यापक मंडळाची नूतन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. यात सर्वानुमते श्रीमती प्र अ सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूलचे दर्शनकुमार अग्रवाल यांची अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली. तर कार्याध्यक्ष पदासाठी श्री शिवाजी हायस्कूलचे कल्पेश थेटे यांची तर सचिव पदी अर्चना बिरारी यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून प्रमोद चिंचोले व भिकन कापडणे, सहसचिव म्हणून उमेश गवळी यांची निवड करण्यात आली.
           नवापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या गणितीय समस्या सोडवणे, तसेच गणित सोप्या पद्धतीने शिकवून सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी आवड निर्माण करणे व विद्यार्थ्यांमधील गणिताबद्दल भीती नाहीशी करून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ही कार्यकारणी कार्य करेल हा विषयावर प्रमुख उद्देश आहे. 
            गणित अध्यापक महामंडळाच्या नवापूर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दर्शन कुमार अग्रवालचे नवापूर एज्युकेशन सोसायटीच्या वतीने व शाळेचे प्राचार्य, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख, सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी सर्वांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post