आज शिंपी समाजाचे अराध्य दैवत संतशिरोमणी संत नामदेव महाराज यांचा संजीवन समाधीदिनानिमित्त प्रा.सौ.कविता पी.खैरनार यांचा लेख

   

नवापूर सत्यप्रकाश न्युज             महाराष्ट्र ही संताची भूमि आहे. त्यात संत नामदेव महाराजानी भागवत धर्माची पताका अवघ्या महाराष्ट्रात नव्हे तर पंजाबमध्येसुध्दा लावली. परंतु आज कित्येकांना नामदेव महाराजांविषयी अनेक प्रश्न निर्माण होतात. ते म्हणजे नामदेव महाराज किती? त्यांचा जन्म कुठला ? नामदेवाचे मुळ गाव ? गुरु कोण? पंजाब व पंढरपूरमधील नामदेव किती? अशा कित्येक प्रश्नांच्या मार घोळ होत असतो संत नामदेव पुण्यतिथीनिमित्त हा लेख. नामदेव यांचा जन्म शिंपल्यातून झाला. या महिपतीकृत दंतकथेत असे म्हटले आहे. नामदेव जातीने शिपी होते. सीपी सिंपू शिंपी शिंपला अशा भागानेही शिंपल्यांतून जन्मकथेची निर्मिती झाली असावी. स्वत: नामदेवांनी असवली माता मज मलमुत्री नवमास वरी म्या वाहिलीसा उदरी,
सिया मामा गर्भ जाणोनियाअसे उल्लेख करून आपला जन्म निसर्गानियमानुसार झाल्याचे सिध्द्ध केले. संत नामदेवांना दिर्यायुष्य लाभले होते. शके १२१८ साली ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यानंतर ५४ वर्ष नामदेव महाराज भागवत धर्माचा प्रसार करीत होत. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी शके १२७२ पंढरपूर येथे समाधी घेतली.

नामदेव बालभक्त म्हणून प्रसिध्द होते. विठ्ठललाचे प्रेम, त्याचा ध्यास सतत नामस्मरण, सत्संगती, किर्तन भगवंत चिंतन यांतच नामदेवांचे आरंभीचे आयुष्य गेले. त्यांच्या पत्नीचे नाव राजाई। होते. नामदेव सदैव ध्यानमग्न व भजनात गुंग राहिल्यामुळे संसाराची चिंता त्यांना वाटत नसे. मात्र राजाई व गोणाई या नेहमीच नामदेवांच्या या बाबतीत चिंतीत राहत होते.
   नामदेवांचा जन्म नरसी बाभणी येथे झाला. नामदेवांच्या जन्माच्या आधीच त्यांचे आई वडील पंढरपूर येथे आले होते. त्यांच्या आईने गोणाईने पंढरपूरच्या विठ्ठलास पुत्रप्राप्तीसाठी नवस केला होता. परंतु नरसी हे गांव दोन तीन वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे नेमके कोणते गांव यांच्यात भ्रम निर्माण झाला. परभणी जिल्ह्यातील नरसी बामणी हेच नामेदवांचे नरसी असे मानले जाते.
नामदेव- ज्ञानेश्वर या दोन महान संताची भेट हा एक महाराष्ट्राच्या इतिहासातील अपूर्व योग होय. प्रवराच्या तीरावर भावार्थ दिपिकेचा सुगंध दरवळला तो भीवरेच्या तीरावर नक्कीच पोचला असावा भीवरेच्या तीरावरील लडिवाळ भक्ती प्रेमाच्या लहरी नेवासे आळंदी येथे येवून पोहचल्या. एक ज्ञानाचा ईश्वर
संत नामदेवांना अनेक नावांनी उच्चारले जाते. त्यात नामा नामदेव, विष्णूदास नामा, विष्णुदा नामदेव,नामा यशवंत, नामा शिंपी नामा पाठक आदींचा समावेश आहे.

नामदेव बालभक्त म्हणून प्रसिध्द होते. विठ्ठललाचे प्रेम, त्याचा ध्यास सतत नामस्मरण सत्संगती किर्तन भगवंत चिंतन यांतच नामदेवांचे आरंभीचे आयुष्य गेले. त्यांच्या पत्नीचे नांव राजाई होते. नामदेव सदैव ध्यानमग्न व भजनात गुंग राहिल्यामुळे संसाराची चिंता त्यांना वाटत नसे. मात्र राजाई व गोणाई या नेहमीच नामदेवांच्या या बाबतीत चिंतीत राहत होते.
    नामदेव- ज्ञानेश्वर या दोन महान संताची भेट हा एक महाराष्ट्राच्या इतिहासातील अपूर्व योग होय. प्रवराच्या तीरावर भावार्थ दिपिकेचा सुगंध दरवळला तो. भीवरेच्या तीरावर नक्कीच पोचला असावा भीवरेच्या तीरावरील लडिवाळ भक्ती प्रेमाच्या लहरी नेवासे आळंदी येथे येवून पोहचलया. एक ज्ञानाचा ईश्वरज्ञानेश्वर दुसरा नामाचा देव नामदेव नुसते ज्ञान रुक्ष न व्हावे, नुसती च भक्त आंधळी न रहावी, ज्ञानास डोळा भक्तीचा र्थ ओलावा प्रत व्हावा व व भक्तीस ज्ञानाचा डोळा प्राप्त व्हावा या दृष्टीने ज्ञानदेव-नामदेव यांची भेट महत्वपूर्ण होतीशके १२१२ मध्ये आळंदीत ही. भेट झाली असावी पंढरीचा प्रेमा घरा आला समजन भावडांनी नामदेवांचा अदर सत्कार केला.. पण नामदेवांनी प्रतिसाद दिला नाही, आणि म्हणूनच मुक्तीबाईने वंदन करण्यास नकार दिलानामदेवांना ऐकविले की, अखंड जयाला देवाचा शेजार, काय अहंकार गेला नाही. म्हणून तिने नामदेवास ऐकविले, 'गुरूविण तुज नव्हेची य मोक्ष' असे सांगून गोरीबा काकांना बोलावून नामदेवांची परीक्षा केली. गुरू कृपेशिवाय नामदेवांचा घट कच्चा ठरला आणि लगेच नामदेवांनी औंठ्यानागनाथास जावून विसोबा खेचरांकडून गुरूपदेश घेतला आणि दोन्ही संतांनी एकत्र बसूनी अनेक गुज गोष्टी केल्या..
भारताची तीर्थयात्रा करण्याचे ठरले. १२-१३-१२१७ च्याकाळातील गोराकुंभार, विसोबा खेचर, परिसा भागवत आदी मंडळी या यात्रेत होती.                    पंढरपूर,तापीतीर, नर्मदातीर, पश्चिम प्रभास
पट्टण सोमनाथ तीर्थ, द्वारका.मथुरा, गया, वाराणसी आदीठिकाणी जावून भागवत धर्माचा प्रसार उत्तर हिंदुस्थानात केला. ही सर्व यात्रा संपूर्ण करून वतिर्थयात्रेतील प्रेमसुख भोगून व लोकांना नामसंकिर्तनाचा सरळ सोपा मार्ग दाखवून ही संतमंडळी १२-१७-१२१८ च्या सुमारास परत आली व यानंतर ज्ञानदेवादी भावडे व चांगदेव यांनी समाधी घेतली. अवघ्या सव्वा वर्षाच्या आत ही घटना झाल्यामुळे नामदेवांच्या दुःखास पारावार उरला नाही. मनाची उदास वृत्ती घालविण्यासाठी नामदेवांनी भारताची पुनर्तीर्थयात्रा केली. शैली शेखर, अरूणाचल, चिदंबर विष्णुकांची रामेश्वर, कन्याकुमारी आदी दक्षिणेकडील तीर्थाचीही यात्रा नामदेवांनी केली. शके १२२० ते १२२६ या काळात पुन्हा उत्तरभारताची यात्रा करून ओंकार, मांधाता, द्वारका, दैवतक, मुचकुंद, स्थानेश्वर, यमुनातीर, इंद्रप्रस्थ हस्तिनापूर, हरिहार, देवप्रयाग, केदार, कैलास, बद्रीनारायण, अयोध्या, मधुपूरी, गोकुळ वृंदावन, मिथीला,काशी, गंगासागरस्नान अशी अनेक तीर्थ पाहिली व भागवत धर्माच प्रसार केल
   पंजाबमध्ये नामदेव
पंजाबमध्ये नामदेवांचे वास्तव्य शके १२७१ पर्यंत होते. पंढरपूरच्या • विठ्ठलाच्या सक्तीच्या प्रसार भागवत धर्माच्या पध्दतीने व किर्तनव्दारा नामदेवांनी केला. पंजाबमधील शीखांच्या ग्रंथसाहब नावाच्या ग्रंथात नामदेवांची अनेक पदे : आलेली आहेत. उत्तर भारतात 4 नामदेवांचे एवढे महत्व वाढले की. नामदेव हे वेगळेच असावेत.
    भक्त नामदेवाची मुखबानी ही नामदेवांची काव्यकृती सर्वांच्या आदरात पात्र झाली आहेत, अशा या महान संतास त्यांच्या संजीवनी समाधीदिनानिमित्त कोटी कोटी वंदन !     प्रा.सौ.कविता पी.खैरनार                  श्रीमती पी.ए.सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर 

Post a Comment

Previous Post Next Post