नंदुरबार - सत्यप्रकाश न्यूज भगवद्भक्तांच्या व साधु-संतांच्या चरण धुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी "पायरीचा दगड" होण्याची श्री. संत शिरोमणी नामदेव महाराजांनी धन्यता मानली. संत नामदेव हे आषाढ वद्य त्रयोदशी, शके १२७२ मध्ये (शनिवारी, दि. ३ जुलै, १३५० रोजी) पंढरपूर येथे पांडुरंगचरणी विलीन झाले. आज नंदुरबार शहरातील श्री. क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक मंडळातर्फे आज दिनांक 15 जुलै 2023 वार शनिवारी संत शिरोमणी नामदेव महाराजांचा 673 व्या संजीवन समाधी सोहळा उत्साहात संपन्न झाला. ह्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी , मध्यवर्ती संस्थाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष भुकनशेठ सावळे , माजी नगरसेवक चारुदत्त कळवणकर, शिंपी समाजाचे जिल्हाध्यक्ष तथा शहराध्यक्ष सोमनाथ नारायण शिंपी , उपाध्यक्ष शैलेश विश्वनाथ शिंपी , महिला जिल्हाध्यक्ष सरिता भामरे , महिला शहराध्यक्ष संगीता शिंपी , जिल्हा युवकाध्यक्ष अजय देवरे आदी उपस्थित होते . मान्यवरांच्या हस्ते नामदेव महाराजांच्या प्रतिमेची पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी दीपश्री ( दुर्वा ) प्रसन्न शिंपी ह्या कन्याने पांडुरंगाच्या वेशभूषा घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
याप्रसंगी माजी आमदार शिरीष चौधरी म्हणाले की , संत शिरोमणी नामदेव महाराजांनी प्रत्येक समाजातील व्यक्तीला सुसंस्कृत करण्याचे काम केले. आपण मुलांना उच्चशिक्षित करत असताना सुसंस्कृत देखील केले पाहिजे तसेच आजकाल मुलं मोबाईलच्या आधीन होत आहे. पालक मुलांच्या हातात मोबाईल देऊन मोठी चूक करत आहे. मुलांना मोबाईल पासून दूर ठेवायला पाहिजे असे मोलाचे मार्गदर्शन शिरीष चौधरी यांनी केले ,ते पुढे म्हणाले की मी जरी अंमळनेर विधानसभा मतदारसंघाचा माजी आमदार असलो तरी देखील शिंपी समाज हा आपला समाज आहे .नंदुरबार शहरातील शिंपी समाजासाठी भविष्यात 30-35 लाखाचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करेन.शिंपी समाज व चौधरी समाज ह्या नांण्याचा दोन बाजू आहेत. आपण नेहमी एकमेकांच्या सुखदुःखात उभे राहत असतो. असे देखील माजी आमदार शिरीष चौधरी यांनी बोलतांना सांगितले.
श्री. संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा दि. 15.07.2023 वार शनिवार रोजी तैलिक मंगल कार्यालय नंदुरबार येथे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. त्या निमित्त श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या पालखीचे पुजन व आरती माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली तैलिक मंगळ कार्यालयापासून , गणपती मंदिर तेथून विठ्ठलाच्या दर्शनाला नामदेवांची पालखी विठ्ठल मंदिरात दाखल झाली. समाज बांधवांनी विठ्ठलाच्या नाम गजर करत तेथून परत पालखी तैलिक मंगल कार्यालयात आणून तेथे महाप्रसादाचा समाजबांधवांनी लाभ घेतला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष सोमनाथ नारायण शिंपी , उपाध्यक्ष शैलेश विश्वनाथ शिंपी , माजी नगरसेवक गजेंद्र लक्ष्मण शिंपी , प्रदिप अमृत शिंपी , दिनेश वासुदेव पवार , अनिल जगन्नाथ जाधव , विजय निंबा देवरे , मोहन रघुनाथ भामरे , योगेश सुरेश खैरनार , वैभव नारायण करवंदकर , विवेकानंद नाटेश्वर खैरनार , प्रशांत गोकुळ बिरारी , राजेंद्र जगताप , सुनील पवार, हितेश अहिरे, डॉ. कमलेश खैरनार , प्रसाद कापुरे , प्रवीण सोनवणे , भावेश बागुल, भटू जाधव , विनोद सोनवणे , हितेंद्र सोनवणे , प्रसन्न शिंपी तथा नंदुरबार शहर शिंपी समाज युवक संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.