येथील अखिल गुजरात श्री क्षत्रिय आहिर शिंपी समाज गुजरात राज्य येथील नवयुवक मंडळाने अत्यंत परिश्रम व तन,मन,धन एकत्र करून समाजा समोर एक ठसा उमटविला आहे अहमदाबाद येथील नवयुवक मंडळाचे अध्यक्ष, श्री, श्रीकांतशेठ जयराजशेठ चव्हाण,, उपाध्यक्ष, श्री,कमलाकरशेठ आनंदाशेठ आहिरे,, खजांची,श्री.निखिल विजय कापडणे यांनी व यांची टीमने रात्रंदिवस स्वताचे कामधंदा व नौकरी करून खूप मेहनतीने सर्व वरीष्ठ पदाधिकारी यांचे मार्गदर्शन व विचारविनिमय घेऊन तसेच घरोघरी जाऊन जाहिरातीसाठी समाज माऊली यांना समजावून सांगून त्यांनी एक आपल्या समोर एक अत्यंत सुंदर असे कॅलेंडर (दिनदर्शिका)2024 तयार करून एक आगळा वेगळा उपक्रम राबविला.
यावेळेस अतिथी विशेष म्हणून अखिल गुजरात राज्य श्री क्षत्रिय आहिर शिंपी समाज अध्यक्ष,, श्री,अशोकशेठ बबनराव ईसइ ,,अ,भा, श्री क्षत्रिय आहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्थांचे गुजरात राज्य संघटक प्रमुख,श्री, चंद्रकांतशेठ नामदेवशेठ ईसइ,,अ,भा, श्री क्षत्रिय आहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्थांचे माजी संपर्क प्रमुख, श्री प्रकाशशेठ हरीचंद्रशेठ कापुरे,,अ,भा, श्री क्षत्रिय आहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्थांचे सुरत, जिल्हा अध्यक्ष, श्री प्रकाशशेठ पंडितराव सोनवणे आदिंची उपस्थिती होती.तसेच अंकलेश्वर येथील समाज बंधूभगिनी हाजर राहून या नभुतो,,नी,, भविष्यती,,असा खूप चांगला प्रकारे नवयुवक मंडळाने हा कार्यक्रम अप्रतिम असा व खुपचं प्रतिसाद मिळाला व संपन्न झाला त्या निमित्ताने सर्व अखिल गुजरात श्री क्षत्रिय आहिर शिंपी समाज गुजरात राज्य येथील सर्व नवयुवक मंडळाचे श्री क्षत्रिय आहिर शिंपी समाज कडून सदर उपक्रमाचे कौतुक करून सर्वाना अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
Tags:
सामाजिक