मुंबई सत्यप्रकाश न्युज दिनांक 28.11.2023 रोजी कोकण विभाग शिक्षकमतदार संघाचे शिक्षकप्रिय आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी ठाणे जिल्हा शिक्षणाधिकारी (प्रथा & माध्यमीक) यांची भेट घेऊन मागील महिन्यामध्ये जिल्हातील अनेक शिक्षकांच्या प्रलंबीत समस्या दिल्या होत्या त्यांचा फोल्लोअप घेण्यासाठी व नवीन शिक्षकांच्या समस्या समजून घेण्यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालय ठाणे जिल्हा परिषद येथे भेट देत शिक्षकांचे प्रलंबीत प्रश मांडले व अनेक शिक्षकांचे प्रश्न तात्काळ सोडविण्यात आले, यावेळी महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे कार्यकर्ते मा. मनोहर पाटकर सर, सतीश ठाणगे सर, विजय राणे सर, किरपाण सर, झोरे सर, मा. संदीप कालेकर सर, वाघमारे सर, आणि अनेक शिक्षक सभासद उपस्थीत होते.