नवापूर सत्यप्रकाश न्युज
स्व.हरीवल्लभदास (हारूकाका ) शाह यांचे कार्य संस्थेसाठी अत्यंत प्रेरणादायी व उल्लेखनीय असुन त्यांचे योगदानाला संस्थेचा सदैव स्मरणात राहील असे मत शहराचे उद्योगपती व संस्थेचे अध्यक्ष विपीनभाई चोखावाला यांनी आपले मत व्यक्त केले.
येथील नवापूर एज्युकेशन सोसायटी संचलित जयहिंद छात्रालयाचे स्व. हरीवल्लभदास नारायणदास शाह जयहिंद छात्रालय असे नामकरण करण्यात आले. या नामकरण विधीच्या अध्यक्षस्थानी नवापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विपिन चोखावाला होते. मुख्य अतिथी गिरधर वंड्रा कार्याध्यक्ष सौ.शितल वाणी, उपाध्यक्ष शिरिषभाई शाह, सचिव राजेंद्रभाई अग्रवाल, कोषाध्यक्ष सतीषभाई शाह, सहसचिव सोहेबभाई मांदा सह संस्थेचे संचालक व स्व.हारुकाकांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते. सुरवातीला मान्यवरांचे छात्रालयात स्वागत करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रार्थनागीत सादर केले. नवीन नामकरण फलकाचे प्रमुख अतिथी गिरधर वंड्रा यांच्या हस्ते फीत ओढून उद्घाटन करण्यात आले. नंतर स्व. हरिवल्लभदास शाह यांच्या प्रतिमेचे प्रमुख अतिथी व मान्यवरांनी पूजन केले. नंतर प्रमुख अतिथी व मान्यवर बँड पथकसोबत वाजतगाजत पुढच्या कार्यक्रमासाठी संस्थेच्या मध्यवर्ती सभागृहात आले. या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सदस्य हेमंत शाह यांनी केले. प्रास्ताविक संस्थेचे सचिव राजेंद्र अग्रवाल यांनी केले. स्व. हरीवल्लभदास नारायणदास शाह यांच्या जीवनावर आधारित डॉक्युमेंटरी (चित्रफीत) दाखविण्यात आली. या चित्रफितीतून त्यांनी संस्थेच्या उभारणीसाठी केलेल्या कार्याची व योगदानाबद्दल माहिती देण्यात आली. त्यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष शिरीष शाह यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी मनोगतातून स्व. हरिवल्लभदास शाह उर्फ हरूकाका यांनी संस्था उभारणीसाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. त्यांनी संपूर्ण जीवन संस्थेच्या विकासासाठी समर्पित केले असे त्यांनी सांगितले. संस्थेचे अध्यक्ष विपोर्न चोखावाला यांनी देशातून व परदेशातून आलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन केले. मुख्य अतिथी गिरघर वंड्रा यांनी शिक्षण व शिक्षकांचे जीवनात काय महत्व आहे हे सांगितले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात विपीन चोखावाला म्हणाले की स्व. हरिवल्लभदास शाह यांनी संस्था उभारणीसाठी केलेल्या कार्याची प्रशंसा केली. त्यांच्यासोबत काम करतांना आलेले अनुभव कथन केले. हरुकाकानी ज्या समर्पित भावनेने संस्थेसाठी कार्य केले त्याची आठवण त्यांनी सर्वांना करून दिली. हरुकाका त्यांनी केलेल्या कार्याच्या रूपात कायम जिवंत राहतील असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक हेमंतभाई शाह प्रास्ताविक सचिव राजेंद्रभाई अग्रवाल तर आभार प्रदर्शन संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीमती शितलबेन वाणी यांनी केले. याप्रसंगी नवापूर एज्युकेशन सोसायटीचे सर्व सदस्य, स्व. हरिवल्लभदास शाह यांच्या परिवारातील सदस्य, नवापूर शहरातील मान्यवर, संस्थेच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक बंधू- भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
Tags:
शैक्षणिक