मी पण तिथेच होतो :-
"न भुतों न भविष्ती
जळगांव सत्यप्रकाश न्युज
साहित्य आणि संस्कृती मंच आणि जैन उद्योग समूह च्या संयुक्त विद्यमाने 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी प्रथमच महाराष्ट्र आणि बृहनमहाराष्ट्रातील मराठी रचनाकारांचे दोन दिवसाचे संमेलन दिमाखदाररीत्या पार पडले। संमेलनाचे उदघाटन जैन उद्योग समूह चे मालक व मराठी साहित्य रसिक
अशोकभाऊ जैन , नामवंत पुढारी - ओजस्वी वक्ते अरुणभाई गुजराथी,
97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.रवींद्र शोभणे , प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर , अरुण म्हात्रे , संयोजक द्वय श्रीकांत तारे आणि पौर्णिमा हुंडीवाले यांच्या हस्ते करण्यात आले। उदघाटन सत्र अशोक भाऊ आणि अरुणभाई यांच्या स्वानुभव आधारित अत्यंत रोचक व विद्वत्तापूर्ण भाषणामुळे श्रोत्यांना खूप आनंदित करून गेले.
अशोक भाऊ आपल्या मर्मस्पर्शी उद्बोधनात म्हणाले,,' हे एक अभिनव आणि अभूतपूर्व असे मराठी साहित्य संमेलन असून माणुसकीचा गहिवर जपणारं तसेच साहित्या सोबत एकमेकांचे सुख- दुःख
एकमेकांशी वाटून घेण्यासाठी मोठ्या आपुलकीनं एकत्र येऊन मन जुळवणारं
संमेलन आहे.
या प्रसंगी अरुण भाई गुजराथी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की मराठी भाषा- साहित्य आणि जोपासण्यासाठी अशी संमेलन भरविणे ही काळाची गरज आहे. आपल्या विशिष्ट शैलीत त्यांनी अनेक किस्से कथन करून श्रोत्यांना हसवून लोटपोट केले होते.
या नंतर साहित्य- संस्कृती- पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे नाट्यकर्मी शंभू पाटील ( जळगांव),सामाजिक कार्यकर्ते शिरीष चिटणीस ( सातारा), वरिष्ठ पत्रकार अनिलकुमार धडवइवाले (इंदूर), संपादक अश्विन खरे ( इंदूर) आणि लेखिका उमा कम्प्युवाले ( ग्वाल्हेर) यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी काही पुस्तकांचे विमोचन देखील झाले.
द्वितीय सत्रात कवी अशोक नायगावकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि कवी अरुण म्हात्रे यांच्या सूत्र संचालनात कवी संमेलन झाले.
संध्याकाळी कवी नायगावकर आणि म्हात्रे यांच्या " कविता ते मिश्किली एक प्रवास" हा अत्यंत गाजलेला- मूड फ्रेश करणारा कार्यक्रम खूप दाद मिळविली. कार्यक्रमात अविरत टाळ्यांचा गजर आणि आनंदोगार व्यक्त होत राहीला । शेवटी श्रोत्यांनी उस्फुर्तरीत्या उभे राहून दोघा दिगग्ज साहित्याकांचे टाळ्यांच्या जोरदार गजरात अभिवादन केले. विशेष आभार मानताना संयोजक डॉ. तारे अत्यंत भारावले होते त्यांचे डोळे ही पाणावले होते.खरोखर यादगार कार्यक्रम होता.
कार्यक्रमानुरूप, प्रभावी आणि आटोपशीर असे संचालन प्रो. संजय बारी आणि आभार प्रदर्शन डॉ.संजय दहाड यांनी केले।
दुसऱ्या दिवशी देखील एक कवी संमेलन पार पडले. या दोन दिवसात " लेखन ते प्रकाशन एक बिकट वाट आणि प्रश्न एक उत्तरे अनेक " विषयावर परिचर्चा - परिसंवाद देखील आयोजित करण्यात आले. कुशल संघठक संयोजक श्रीकांत तारे यांनी तीन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ( ) व्हॉट्सअप ग्रुप च्या साहित्यिक मंडळींचा हा मेळावा होता. डॉ.तारे ,मध्यप्रदेश मराठी अकादमी ( भोपाळ)च्या माजी निदेशक पौर्णिमा हुंडीवाले,डॉ. संजय दहाड आणि नामवंत वकील सुशील अत्रे या चौघांच्या कुशल संयोजनाखाली झालेल्या या संमेलनास सफल करण्यात उदार हृदयाच्या अशोक भाऊ यांचा सिंहाचा वाटा होता.त्यांच्या मुळेच सहभागी झालेल्या सर्व साहित्यिकांना
कल्पनेपलीकडील व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली. निवास- जेवण- नास्ता- चहा- कॉफी ची फाईव्ह स्टार हॉटेल समान व्यवस्था होती. शिवाय निसर्गरम्य हिल्स वर
ई रिक्षा सुविधा देखील उपलब्ध होत्याच. संयोजक गण सर्वांची जातीने विचारपूस करीत होते.या मोठ्या उत्साहात झालेल्या संमेलनात मध्यप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान , गुजराथ -उत्तर प्रदेश आणि दक्षिण भारतातील शेकडों ज्येष्ठ आणि नवोदित साहित्यिक सहभागी झाले होते.
संमेलनात कार्यकर्त्यांची उणीव मात्र निदर्शनात आली. संयोजक आणि बाहेरून आलेल्या कार्यर्यकर्त्यांनी सर्व व्यवस्थित सांभाळून घेतले.
Tags:
साहित्यिक