सन २००३ पासून प्रलंबित असलेल्या कनिष्ठ महाविद्यालय वाढीव पद मान्यतेचा जटिल प्रश्न तसेच त्यामध्ये पडलेले अनेक प्रकार आणि त्यातून निर्माण झालेली गुंतागुंत मागील दशकाहून अधिक काळ विनावेतन अध्यापन करताना वाढीव पदावर कार्यरत असणाऱ्या शिक्षकांची झालेली दयनीय अवस्था ..... अखेर गुरुवारी शासनाने आदेश काढून हा प्रश्न मार्गी लावला. या कामी कोकण विभागाचे लोकप्रिय शिक्षक आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी सतत मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला. दर मंगळवारी मंत्रालयातभेट देऊन सचिव व शिक्षण मंत्र्यांशी संवाद साधला व शिक्षकांच्या व्यथा मांडून हा प्रश्न लवकर निकाली काढण्यासाठी आपली आक्रमक भूमिका मांडली म्हात्रे सरांनी वाढीव पदांच्या शिक्षकांच्या विविध आंदोलने, मोर्चामध्ये स्वतः सहभागी होऊन आक्रमकपणे हा विषय मांडला .या प्रश्नांची दाहकता शिक्षण मंत्री माननीय दीपक केसरकर साहेब यांना समजावून सांगितली .आमदार होण्यापूर्वी सुद्धा म्हात्रे सरांनी आझाद मैदानावर वाढीव पदांच्या प्रश्नासंबंधी शिक्षकांसोबत आंदोलने केली.या शासन निर्णयामुळे राज्यातील 283 वाढीव पदावर कार्यरत असणाऱ्या शिक्षकांचे समायोजन होणार आहे व त्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या कामी राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब ,उपमुख्यमंत्री श्री अजित पवार साहेब, कनवाळू शिक्षण मंत्री आदरणीय श्री दीपकजी केसरकर साहेब यांचे मनःपूर्वक आभार तसेच शिक्षण विभाग सचिव, उपसचिव व कक्ष अधिकारी वाढीव पद मान्यतेसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व शिक्षक संघटना यांचेही आभार
वाढीव पदावरील शिक्षक श्री.सचिन चव्हाण, श्री. पी.एन ओऊळकर, श्री. शामसुंदर पाटकर तसेच राज्यातील सर्व वाढीव पदावरील शिक्षक यांनी कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांचे आभार मानले.