नितीन डोंगरे यांची अध्यक्ष पदी निवड..

कोपरगांव सत्यप्रकाश न्यूज 
   येथील सुप्रसिद्ध करसल्लागार श्री नितीन दत्तात्रय डोंगरे यांची उत्तर महाराष्ट्र करसल्लागार प्रॅक्टिशनर्स असोसिएशन च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
   नितीन डोंगरे हे कोपरगांव जि.अहमदनगर येथील "एनएनके कॅपिटल" चे संचालक असून, करसल्लागार म्हणून ते परिसरातील उद्योजक,व्यावसायिकांना गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक सल्लागार म्हणून करसेवा देत असून त्यांनी उत्तर महाराष्ट्र करसल्लागार प्रॅक्टिशनर्स असोसिएशन चे सचिव पदाची जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडली. याच कार्यकाळात त्यांनी, नाशिक येथे "विभागीय करपरिषदेचे" तर शिर्डी येथे "नॅशनल टॅक्स कॉन्फरन्स" चे यशस्वी आयोजन केले होते. 
ते समाजातील विविध उपक्रमात देखील अत्यंत हिरीरीने सहभाग नोंदवून समाजबांधवाचा उत्साह वाढविण्याचे काम करतात. 
श्री नितीन डोंगरे यांच्या या स्तुत्य निवडीबद्दल उत्तर महाराष्ट्र करसल्लागार प्रॅक्टिशनर्स असोसिएशन चे सर्व पदाधिकारी व अ.भा.शिंपी समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा प्राप्त होत आहेत .

Post a Comment

Previous Post Next Post