नवापूर सत्यप्रकाश न्यूज तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वासरवेल, केंद्र धनराट तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री प्रकाश कृष्णा गावीत व शाळेचे शिक्षक वृंद यांनी दिवाळी अभ्यास पुस्तिकेचे शालेय विद्यार्थ्यांना वाटप केले, सोबतच लेखन साहित्य व फराळ देखील देण्यात आला.
विद्यार्थ्यांनी सुट्टीत आनंदाने खेळत बागळत अभ्यास देखील करावा यासाठी अभ्यास पुस्तिकेचे वाटप केले असल्याचे विद्यार्थ्यांना अध्यक्ष महोदय यांनी सांगितले.
शिक्षकांनी सोबतच विद्यार्थिनींना आकाश कंदील कसा बनवावा याचे प्रात्यक्षिक करून दाखवले व विद्यार्थिनींकडून आकाश कंदील बनवून घेतला.
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई संगीत परीक्षेला शाळेतील विद्यार्थी प्रारंभिक व प्रवेशिका वर्गात बसले असून सुट्टी कालावधीत श्रीरामोळे हे संगीत वर्ग घेणार असल्याचे अध्यक्ष महोदय यांनी स्पष्ट केले तेव्हा जे विद्यार्थी गावाला जाणार नसतील अशा विद्यार्थ्यांनी सुट्टी कालावधीत दररोज शाळेत येऊन दोन तास संगीत अध्ययन करावे, पालकांनी या सूचनेस सर्वानुमते संमती दर्शविली.