येथील श्रीमती प्रतापबा अभेसिंग सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये स्काऊट गाईड स्थापना दिवस व ध्वज दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व प्रथम लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे प्राचार्य मिलिंद वाघ, उपमुख्याध्यापक नारायण मराठे, पर्यवेक्षक दीपक मंडलिक, कनिष्ठ महाविद्यालय विभागाच्या विभाग प्रमुख मेघा पाटील स्काऊट मास्टर डॉ. गणेश महाजन, अमोल दिवटे रोव्हर् रेंजर युनिट लीडर सी. एस. पाटील, गाईड विभागाच्या कॅप्टन मीनल पाटील, दर्शन अग्रवाल व शिक्षक बंधू भगिनी, स्काऊट्स, गाईडस् उपस्थित होते.
प्राचार्य मिलिंद वाघ यांनी आपल्या मनोगतातून शील संवर्धन, कौशल्य, आरोग्य, यासारख्या विविध उपक्रमाद्वारा चारित्र्यसंपन्न पिढी निर्माण करण्यासाठी या चळवळीचे महत्व सांगितले. स्थापना दिनाच्या निमित्ताने स्काऊट, गाईडच्या मुलांनी ते रुजवून घेतले. 74 व्या स्थापना दिनानिमित्त व ध्वज दिनाच्या निमित्ताने एकता स्टिकर्स चे वाटप प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. गणेश महाजन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व स्काऊट मास्टर्स, गाईड कॅप्टन्स,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
Tags:
शैक्षणिक