नवापूर आगारात आयुर्वेदिक आरोग्य शिबीर संपन्न

नवापूर सत्यप्रकाश न्यूज 
    येथील महाराष्ट्र परिवहन, (एस. टी.) आगारात आयुर्वेंस लाईफ केअर सेंटर मुंबई द्वारे नवापूर आगारातील वाहन चालक तंत्र कामगारांसाठी आयुर्वेदिक आरोग्य शिबीराचे आयोजन आगार प्रमुख विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार प्रकाश वाय.खैरनार, जनकभाई दलाल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले 
     या वेळेस उपस्थित डाॅ.तेजस गायकवाड, डाॅ.दिपक मोरे,डॉ.विठुसिंग, डॉ.सार शेख ,विक्रांत मोरे आणि सहकाऱ्चे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
     आपल्या मनोगतात आगार प्रमुख विजय पाटील म्हणाले की आजच्या धावपळीचा काळात व येणाऱ्या दिपावली सणानिमित्त आगाराचे सर्व वाहन चालक, वाहक, व तांत्रिक कामगारांची अत्यंत धावपळ होणार असून या वेळेस आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होणार असून आपले आरोग्य सुदृढ होण्यासाठीच या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, आयुर्वेद हा उपचार अत्यंत प्राचीन प्रकार असून या औषधींचा कोणताही दुष्परिणाम होत नाहि.तसेच एस.टी.वाहन चालक व वाहक एकटे राहत नसून त्यांच्यावर अनेक प्रवाशांची जवाबदारी प्रवास करतांना असते म्हणून जर आपण सुदृढ राहिलो तर सर्व काहि व्यवस्थित पार पडते.
       आजच्या आरोग्य शिबीरात मुंबई येथील आलेल्या नवापूर आगारातील 25 कामगारांचे ब्लड पेशर ,शुगर , नेत्रतपासणी करून त्यांना योग्य औषधोपचार घेण्याचे मार्गदर्शन आलेल्या डाॅक्टरांनी दिलेत.
     शिबीर यशस्वीतेसाठी रविंद्र जगताप, लेखापाल गायकवाड, भावीन पाटील, अहिरे मामा,वसंत गावीत राजेंद्र पारधी यांनी परिश्रम घेतलेत आपल्या शरीराची योग्य तपासणी ती देखील मोफत झाल्याने आगारातील कर्मचाऱ्यांचा चेहऱ्यावर आनंद दिसत होता व शिबीराचे आयोजन केल्याबद्दल आगार प्रमुख व उपस्थित डाॅक्टरांचे कर्मचाऱ्यांनी मनापासून आभार व्यक्त केले.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ज्ञानेश्वर पवार यांनी व्यक्त केले.
    

Post a Comment

Previous Post Next Post