कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आ.डॉ.ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री, अजित पवार साहेब, यांना ई मेल द्वारे पत्र पाठवून त्यात आमदार प्रशांत बंब यांच्या शिक्षकांविषयी डी.ए. वाढ बाबत सहमत नसलेबाबतच्या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आ. प्रशांत बंब, आमदार गंगापूर विधानसभा यांनी दिनांक 29/11/2023 रोजी शिक्षकांना महागाई भत्ता देऊ नये असे पत्र शासनाला दिले आहे.
परंतु महाराष्ट्र राज्यातील आमचे शिक्षक बांधव नेहमीच राष्ट्रहिताचे काम म्हणून दिवस-रात्र मेहनत करीत आहेत.शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व कर्मचान्यांना जे लाभ दिले जातात, तेच लाभ शिक्षकांसाठी लागू आहेत. देशाचे भवितव्य घडवणाऱ्या शिक्षकांच्या बाबतीत आमदार प्रशांत बंब यांनी अशा प्रकारचे पत्र देणे योग्य नाही. हे शासन नेहमी शिक्षकांच्या बाजूने सकारात्मक विचार करणारे आहे. म्हणून सदर आमदारांनी दिलेल्या पत्राचे समर्थन न करता शिक्षकांना महागाई भत्ता द्यावा अशी मागणी विधानपरिषद सदस्य आ.डॉ.ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केली आहे.
Tags:
शैक्षणिक