आजच्या आरोग्य धनसंपदा सदरातील आजिबाईचा बटव्यात डॉ एम.बी.पवार यांचे आरोग्य आणि योगा ? या विषयावर मार्गदर्शन विशेष सहकार्य प्रविणभाउ देवरे, नाशिक

नाशिक सत्यप्रकाश न्युज 
      योगा करतांना कोणती काळजी घ्यावी 
     वृद्धपणी आरोग्य सुधारक म्हणून योगा करावा का ?
   निरोगी रहाण्यास योगा.व्यायाम कसा महत्त्वाचा असतो ?
   नांव - सौ.कल्पना जितेद्र् जाधव. बजाज रोड. ऊल्हासनगर
     आपणांस उत्कृष्ट निरोगी जिवनशैली हवी असेल तरआपण
जिवनात योगा.व्यायाम करावा.
योगामुळे शरिर नेहमी निरोगी .
उत्साही .आनंदी.सतेज रहाते .यो
गा हा नियमानुसार .वेळेवर करावा
हा एक व्यायामाचा प्रकार आहे.
आपण सध्या धावपळीच्या युगात स्वतः कडे दुर्लक्ष करतो.खरं म्हणजे - योगामुळे मनातिल ताणं
तणावं.विचार .टेन्शन.कमी होऊन
हृदयाचा रक्तदाब नियत्रणांत रहातो. खरं म्हणजे योगा.व्यायाम आजाराला शरिरातुन पळवतो.या
मुळे मानसिक.आत्मिक समाधान मिळते.आरोग्य सुदृढ होते.योग
सकाळी लवकर उठुन नियमित केल्यास जिवणातिल ताणतणावं
नष्ट होऊन दिवसभर शरिराला
एनर्जी मिळुन उत्साह कायम रहातो.आजकालच्या खाण्याच्या पध्दती बदलामुळे शरिरातिल चरबी वाढुन लठ्ठपणा निर्माण होतो.वजन वाढते.ब्लडप्रेशन .डाय
बेटिज वाढते.पण योगा.व्यायाम त्यातिल काही आसने केल्यामुळे 
पचनक्रिया वाढुन चरबी वाढु शकत नाही.योगाने रक्ताभिसरण 
वेगाने वाढते.सर्व अवयवांना व्यायाम मिळतो.श्वासोच्छवास योग्य तर्हेने होऊन कफ.खोकला.
अँलर्जी .फफ्फुसाचे आजार होत नाही. शरिराला निरोगी ठेवण्यासा
ठी योगाभ्यासाला महत्त्व आहे.
नियमित योगाकेल्याने माणसाचे
वजन.हाडं.मांसपेशी आणि सांधे
बळकट होऊन दणकट होतात.
 शरिराला एक प्रकारे ऊर्जा मिळते
आपण आजारापासुन दुर होतो.
        भारतात योग पध्दतिची परंपरा १५०० वर्षापासुन सुरु आहे. योग ह्या शब्दाचा अर्थ युज म्हणजे वापरणे.ह्या धातुपासुन आहे.शरिर इंद्रिये .मन.आणि आत्मा यांचे संतुलन ठेवणे.
 .योगसुत्रांच्या ८ अवस्थेत -- यम.नियम.आसन.प्राणायाम .
प्रत्याहार.धारणा.ध्यान.अहिंसा.सत्य .ब्रम्हचर्य .अपरिणित.असे नियम आहेत.स्वतःचे शरिर आणि मन यांची शुध्दता या बिंदूतून करणे.
     वृध्दत्वात योगाने  आरोग्य सुधारणा 
      तरुणपणी शरिर आपल्याला 
साथ देते.कारण त्यावेळी रक्ताभिसरण सुदृढ असते.
.कोणत्याही आजाराला प्रकृती साथ देते.जसं वय वाढतं तश्या आजारपणाच्या समस्या .तक्रारी
वाढतात.कारण शरिराला मर्यादा 
असतात.त्यासाठीच सुरवातीला योगा.व्यायाम केला तर उतारवया
त आजार होत नाही.
 योगा करतांना कोणती काळजी घ्यावी. 
   निरोगी शरिराला योगा करण्यापुर्वी किंवा करतांना ----
      १) कधिही मधेच पाणी पिऊ नये.असे केल्यास सर्दी.अँलर्जी ,कफ होऊ शकतो.
      २)योगा सकाळी उपाशी पोटी
किंवा पोट साफ झाल्यानंतर करावा.अन्यथा फायदा होत नाही.
     ३) योगा करतांना शरिराला सैल कपडे .सुतीचे घाला .त्यामुळे आपणांस हलके वाटते.
     ४)योगा नेहमी मोकळ्या हवेत.
स्वच्छ जागी करावा.उन्हाळ्यात बाल्कनी किंवा बागेत करावा.
     ५)योगा करतांना प्रथम सोपी नतंर कठिण आसनं करावी.त्यामु
ळे शरिराला थकवा येत नाही.
     ६)योगा हा एखाद्या गुरुजी शिक्षक यांच्या देखरेख खाली करावा.चुकीचे आसन केल्यास 
कंबरदुखी.गुडघे दुखी.मसल्स वेदना होऊ शकतात.
     ७)योगा हा सपाट जमीनीवर करावा.सोफा.दिवाण.पंलगावर करु नये.
     ८) योगाकेल्याने शरिरात खुप
उष्णता निर्माण होते.त्यामुळे लगेच अंघोळ करु नये.
     ९) शरिरात ताप असल्यास .
मासिक पाळीत योगा करु नये.
    १०) कोणतेही आसन केल्यास विपरीत केल्यास ताणतणावं.कष्ट झाल्यास ते करु नये.
      योगा आसन प्रकार 
१) उभे असतांना करावयाचे आसन.-
      1] वृक्षासन.
      2] विरासन.
      3]तिकोणासन.
      4] शिर्षासन.
२)बैठी आसन.-
     1] पद्मासन.
     2] आकर्ण आसन.
     3] धनुरासन.
     4] वक्रासन.
     5] पश्चिमोत्रासन.
३) पोटावर झोपुन .विपरित शयन आसन 
     1] भुजंगासन .
     2] शलभासन.
     3] धनुरासन.
      4] नौकासान.
४)झोपुन (शयनासन ) करावयाचे आसन -
     1]द्विपाद व उत्तनासन.
      2] विपरित करणी.
      3]सर्वगांसन.
      4] मत्सायन आसन.
      5] हलासन.
      6] नौकासन.
      7] पवनमुक्तासन.
      9] शवासन.
     योगा बरोबर रोज सकाळी ५ वाजता ५५ते ७० मिनिट चालणे हा सर्वसुदंर व्यायाम आहे.यात शरिराला सकाळची शुध्द अल्हादायी.स्वच्छ हवा मिळते.
यामुळे शरिरातिल कफ. सर्दी.खोकला .दमा.हृदयआजार .संधिवात.वाताचे आजार होत नाही.आयुष्य निरोगी रहाते.
मार्गदर्शक - डॉ एम.बी.पवार, विशेष सहकार्य प्रविणभाउ देवरे ,नाशिक 
          
     

Post a Comment

Previous Post Next Post