शिवपुराण कथेत लाखो भाविक उपस्थित राहणार

जळगाव : सत्यप्रकाश न्युज
    वडनगरी येथील बडे जटाधारी महादेव मंदिर ट्रस्टतर्फे मंगळवारपासून शिव कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेसाठी आयोजन समितीकडून तयारी अंतिम टप्यात आली असून, मुख्य मंडपासह इतर व्यवस्थेचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. दोन दिवसात कथेची तयारी पूर्ण होणार असल्याची माहिती जगदीश चौधरी यांनी दिली.
५ ते ११ डिसेंबरदरम्यान वडनगरी फाट्याजवळील बडे जटाधारी महादेव मंदिराकडून या कथेचे आयोजन करण्यात आले आहे. कथेसाठी तब्बल 300 एकर शेतात मंडप टाकण्यात आला आहे. अवकाळी पावसामुळे या कथेच्या तयारीवर परिणाम झाला होता. मात्र, आयोजन समितीसह नागरिकांकडून पूर्ण क्षमतेने काम केले जात असल्याने, कथेच्या दोन दिवसांआधीच कथेसाठीची तयारी पूर्ण होणार असल्याचीही माहिती आयोजन समितीकडून देण्यात आली आहे
कथेच्या ठिकाणी कसे जाणार?
१. जळगाव रेल्वेस्टेशनपासून केवळ ८ किमी अंतरावर वडनगरी फाट्याजवळ कथेचे ठिकाण आहे. २. जळगाव शहरातून शिवाजीनगर उड्डाणपूल, पिंप्राळा उड्डाणपूल व सुरत रेल्वे गेटकडून कानळदा रस्त्याकडून कथेच्या ठिकाणी पोहचता येणार. 
३. चोपड्याकडून खेडीभोकरी, भोकरमार्गे व विदगावमार्गे कथेच्या ठिकाणी पोहचता येणार.
५ ते ११ डिसेंबरदरम्यान राहणार कथा
५ ते ११ डिसेंबरदरम्यान दररोज दुपारी १ ते ४ वाजेदरम्यान शिवमहापुराण कथेचे वाचन केले जाणार आहे. सोमवारी प्रदीप मिश्रा यांचे जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन होणार असून, ४ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता जळगाव रेल्वे स्टेशन ते वडनगरी फाट्याजवळील बड़े जटाधारी महादेव मंदिरापर्यंत प्रदीप मिश्रा यांची शोभायात्रा काढण्यात येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post