मतदार यादीत नांव नोद करण्याचे तहसिलदार महेश पवार यांचे युवक - युवतींना आवाहन..

नवापूर सत्यप्रकाश न्युज
    शहरासह तालुक्यातील सर्व युवक व युवती ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण होत आहे अशा सर्व नव मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंद करण्याचे आवाहन येथील तहसिलदार व कार्यकारी दंडाधिकारी महेश पवार यांनी नव मतदारांना केले आहे.
     येणारा काळ हा निवडणूकीचा काळ असुन मतदान करणे हा आपला हक्क आहे व कर्तव्य देखील,आपल्या मताने आपली लोकशाही बळकट होणार आहे म्हणून सर्वानी मतदान करणे गरजेचे आहे तर देशाचा विकासासाठी आपले मतदान रूपी योगदान महत्त्वाचे आहे परंतु त्या साठी आपले नाव मतदार यादीत नोंद करणे गरजेचे आहे, सध्या देशात नव मतदार नोंदणीचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला असून मतदार यादीत नोंद करण्याचे काम जोरात सुरू आहे, ज्या युवक युवतीचे वय १८ वर्षाचा वर असेल त्यांनी फार्म नं.६ भरून , रहिवासी पुरावा, ओळख पुरावा, जन्माचा पुरावा आदि माहिती घेऊन आपले नाव मतदार यादीत नोंद करून घेण्यासाठी तहसिलदार कार्यालयातील निवडणूक शाखेसह आपल्या घरी येणारया मतदार प्रतिनिधी कडे नोंद करणे गरजेचे आहे या साठी आपले आधार कार्ड व जन्म प्रमाणपत्रचा पुरावा अवश्य आहे.
      नवापूर शहरासह तालुक्यात जास्तीत जास्त मतदार नोंदणी होण्यासाठी शाळा, महाविद्यालये , बस स्थानक, आदी ठिकाणी सह मतदान प्रतिनिधी कार्यरत असून जनजागृती केली जात आहे या साठी स्वतः तहसिलदार देखील विविध ठिकाणी जाऊन आवाहन करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post