कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे शिक्षक लोकप्रिय आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे सर सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असताना सिंधुदुर्ग जिल्हातील अनेक शिक्षक व शिक्षकेतर बांधवांचे प्रश्न समजून घेण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल कसाल ता. कुडाळ येथे उपस्थीत राहून अनेक शिक्षक व शिक्षकेतर बांधवांचे प्रश्न समजून घेतले आणि तात्काळ शिक्षण उपसंचालक मा. महेश चौथे साहेब, सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षणाधिकारी मा. सुभाष चौगुले साहेब, लेखाधिकारी मा. छडीदार साहेब यांच्याशी फोन वर संपर्क करून तात्काळ सर्व प्रश्न मार्गी लावले व जे प्रलंबीत प्रश्न आहेत ते लवकरात लवकर सोडविण्याच्या सूचना केल्या*.
त्या नंतर आपले शिक्षक . कमलेश गोसावी यांच्या वडिलांचे दुखःद निधन झाले होते त्यांच्या घरी सांत्वन पर भेट दिली.
या दौऱ्या दरम्यान जिल्ह्यातील शिक्षक बांधवांच्या बाबतीत घडलेल्या दु:खद घटना समजताच तात्काळ शिक्षकांप्रती असलेल्या भावनापोटी करंजे हायस्कूल चे आपले शिक्षक बंधू दिवंगत अशोक कांबळे यांचे अकस्मीत निधन झाले त्यांच्या घरी देखील सांत्वन पर भेट दिली
बिडवाडी हायस्कूल चे शिक्षक दिवंगत श्रीकांत शेटे सर यांचे देखील अकस्मीत निधन झाले त्यांच्या घरी देखील सांत्वन पर भेट देऊन त्यांच्या विधवा पत्नीला व लहान मुलांना धीर दिला, आपण कोणिही घाबरू नका मी शिक्षक आमदार म्हणून आपल्या कुटुंबासोबत आहे आपणास आवश्यक ती मदत केली जाईल आपण खचून जाऊ नका असा मोलाचा सल्ला दिला
या दोऱ्यावेळी त्यांच्या सोबत.वामन तर्फे अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघ, .गुरुदास कुसगांवकर सचिव सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघ, कणकवली तालुका अध्यक्ष रवींद्र सावंत, सचिव .शरद चोडणकर, कास्टाईबचे.आकाश तांबे, सुभाष खरात श्री.तवटे सर उपस्थित होते.
Tags:
शैक्षणिक