कनिष्ठ महाविद्यालयांतील अतिरिक्त शिक्षक, वाढीव पदावर काम करणाऱ्या शिक्षकांच्या समायोजनाची कार्यशाळा संपन्न.

जळगाव: सत्यप्रकाश न्युज 
   आज दि.५ डिसेंबर रोजी मूळजी जेठा महाविद्यालयाच्या परिषद  सभागृहात जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील अतिरिक्त शिक्षक व वाढीव पदावर काम करणाऱ्या शिक्षकांच्या समायोजनाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेस नाशिक विभागाचे सहाय्यक संचालक श्री.एल.डी. सोनवणे साहेब, सहायक शिक्षण उपनिरीक्षक श्री.दिनेश देवरे, श्रीमती. दिपाली पाटील (सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक उच्च माध्यमिक जि.प. जळगाव), श्री.घनश्याम गवळे (वरिष्ठ लिपिक संचालक कार्यालय, नाशिक) हे उपस्थित होते. याप्रसंगी डॉ.श्री.एस. एन.भारंबे (प्राचार्य मू.जे. महाविद्यालय) डॉ.सौ.गौरी राणे (प्राचार्य अण्णासाहेब डॉ.जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालय) श्रीमती करुणा सपकाळे (उपप्राचार्य) श्री.आर.बी. ठाकरे (पर्यवेक्षक स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय -मू.जे. महाविद्यालय, जळगाव), जुक्टो संघटनेचे पदाधिकारी प्रा.नंदन वळींकार (अध्यक्ष), प्रा.सुनील सोनार (सचिव), डॉ.अतुल इंगळे (उपाध्यक्ष), प्रा.सुनील गरुड (जेष्ठ मार्गदर्शक) आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.उमेश पाटील यांनी केले. कार्यशाळेच्या  प्रास्ताविकात श्री.दिनेश देवरे साहेबांनी शासन स्तरावरून समायोजनाचे निकष स्पष्ट केले. त्यानंतर श्री.एल.डी सोनवणे साहेबांनी विस्तृत मार्गदर्शन करताना जिल्ह्यातील सर्वच कनिष्ठ महाविद्यालयांनी आपापल्या आस्थापनेवर कार्यरत असणारे, त्याचबरोबर रिक्त पदे, वाढीव पदे  व अद्ययावत  बिंदूनामावली यांची माहिती दिलेल्या प्रपत्रात भरून द्यावी. सदर माहिती माहे डिसेंबर २०२३च्या आत भरून देणे क्रमप्राप्त आहे. विशेषत: संस्थेने एकापेक्षा जास्त संख्येने असणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांची माहिती अद्ययावतरित्या भरून संपूर्ण संस्थेची एकच बिंदूनामावली तयार करावी. शासन स्तरावरून कनिष्ठ महाविद्यालयातील रिक्त पदे पवित्र पोर्टलद्वारा भरली जाणार असल्यामुळे बिंदू नामावली परिपूर्ण असणे गरजेचे असल्याचे सांगितले. नाशिक विभागात एकूण ७९ पायाभूत पदे असून १७ पदे अतिरिक्त ठरलेली आहेत. या सर्व पदांचे समायोजन करण्यासाठी या सर्व बाबी अत्यावश्यक आहेत असेही श्री.सोनवणे साहेबांनी नमूद केले. या संपूर्ण कार्यशाळेच्या आयोजनामध्ये जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे सहकार्य लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post