नागपूर येथील विधान भवनात शिक्षक आमदारांनी केली शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा

 मुंबई सत्यप्रकाश न्युज
       महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी  आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नागपूर येथे  विधान भवनात   शिक्षण मंत्री  ना. श्री दीपकजी केसरकर साहेब  यांनी बैठक आयोजित केली  त्यामध्ये प्रामुख्याने
 1)शेवटचा वर्गाची पटसंख्या सरासरी धरणे किंवा 23- 24 ची पटसंख्या  पकडणे- शिक्षण मंत्री फायनल विचार करणार
2) आयुक्त स्तरावरील  अघोषित शाळांचे  सर्व प्रस्ताव मंजूर करून अनुदान देणे  - मागणी मान्य
 3) ज्या शाळेतील शिक्षक शिक्षकेतरांचे जावक नंबर जुळत नाही किंवा नोंदी नाहीत, त्यांच्या बाबतीत सहानभूतीने विचार करून  11 मुद्दे  तपासून अनुदान देण्याचे ठरले.
4) 20% अनुदान मंजूर झालेल्या शाळेतील  शिक्षकेतरांचे  11 पैकी सहा मुद्दे  उपलब्ध नसतील तर दोन मुद्दे  धरावेत व अनुदान द्यावे.
5) शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती कोर्टाची स्थगिती असल्यामुळे करता येत नाही, परंतु एकही कर्मचारी जिथे  नाही ,काहीतरी मार्ग काढावा अशी मागणी केली
6) पुढील टप्पा वाढ  1 जानेवारीपासूनच मिळणार, दरवर्षी 30 नोव्हेंबर ची पटसंख्या बघून  टप्पा वाढ न थांबता देणार
7) उच्च माध्यमिक विद्यालयातील आयटी शिक्षकांना  अनुदान मिळावे
       उर्वरित विषय  सोमवारी सर्व आमदार एकत्रित बसून चर्चा करणार आहेत व  पुन्हा शिक्षण मंत्र्यांसोबत मीटिंग घेणार आहेत असे ठरले आहे
        यावेळी बैठकीस कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आ. ज्ञानेश्वर म्हात्रे , आमदार निरंजन डावखरे , आ. मनीषा कायंदे , आ. विक्रम  काळे, आमदार किशोर दराडे, आमश आ. जयंत आसगाकर, आ. सुधाकर आडबले,आ. किरण  सरनाईक , आ. सत्यजित तांबे,  आ. राठोड,माजी आमदार श्रीकांत देशपांडे ,  तसेच प्रधान सचिव रणजित सिंह देओल,शिक्षण आयुक्त,सूरज मांढरे, सह सचिव-  समीर सावंत,  करपते साहेब उप सचिव तुषार महाजन , काझी साहेब  उपस्थित होते.
--

Post a Comment

Previous Post Next Post