युवकांचा सर्वांगीण विकास, संस्कृती व परंपरा जतन, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागावी यासाठी राष्ट्रीय व राज्य स्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. 2023-24 या वर्षातील युवा महोत्सवाचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार येथे आयोजित करण्यात आले होते.
या युवा महोत्सवात कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक च्या अभ्यास केंद्रातील कु. कोमल राजू साळवे, तृतीय वर्ष कला या विद्यार्थिनीने पोस्टर मेकिंग स्पर्धेत सहभाग नोंदवला व द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. कु. कोमल साळवे हिची नाशिक येथे होणाऱ्या विभागीय युवा महोत्सवासाठी निवड झाली.
कु. कोमल साळवे हिच्या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार श्री शिरीषकुमार नाईक व इतर सन्माननीय संचालकांनी समाधान व्यक्त केले. केंद्रप्रमुख डॉ. ए. जी. जयस्वाल, केंद्र संयोजक प्रा. वाय. जी. भदाणे, समंत्रक, कर्मचारी कु. मीना शहा, अभय पाटील, मिलिंद पाटील, व्ही. एस. पाटील यांनी अभिनंदन केले.
Tags:
यश/ निवड