तालुका स्वच्छता अभियानात नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे दुसरा टप्यामध्ये घनकचराव्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापनाची पारदर्शक काम करून हे अभियान ही यशस्वी करण्यात नवापूर तालुका पुढे असणार अशी सरपंच ग्रामसेवक कार्यशाळेत। बोलताना गटविकास अधिकारी देवीदास एम देवरे यांनी मनोगत व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, गावात कचरा संकलन करून सांडपाण्याचे व्यवस्थापन करून कशा पद्धतीने आपल्याला त्याचा पुनर्वापर करता येईल यावरही भर देण्यात यावा व स्वच्छ भारत मिशन टप्पा २ यशस्वी करून दाखवावा, असे प्रतिपादन केले.
यावेळी प्रमूख पाहूणे म्हणून नवापूर पंचायत समिती सभापती बबीताताई गावित पंचायत समिती सदस्य ललिता वसावे, सहाय्यक गट विकास अधिकारी एस डी पाटील, विस्तार अधिकारी (पंचायत) ए.डी. वरसाळे उपस्थित होते. प्रशिक्षण अंतर्गत मानवी जीवनात स्वच्छतेचे महत्त्व, स्वच्छ भारत अभियान टप्पा क्र.२ चा परिचय, घनकचरा आणि दिले.
सांडपाणी व्यवस्थापन, त्यासंदर्भातील विविध उपाययोजना, शासन निधीची उपलब्धता, ग्रामस्थांची भूमिका व जबाबदारी याविषयी तज्ज्ञ प्रशिक्षक सीमा पाडवी, प्रियंका गावित, रवी गोसावी, सुरेश महाले, प्रमोद वाणी, संजय वळवी, मालिनी गावित, मनीषा पाडवी, पूजा शर्मा यांनी प्रशिक्षण दिले .
प्रशिक्षणास नवापूर तालुक्यातील
विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, स्वच्छ्ता व पाणीपुरवठा समिती अध्यक्ष, ग्रा.पं. सदस्य, ग्रामसेवक, आशा कार्यकर्त्या, स्वच्छताग्रही, महिला बचत गट सदस्य आदी सहभागी होते. प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल उपस्थितांना नवापूर पंचायत समिती सभापती बबिता गावित यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
Tags:
शासकीय