परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा.डॉ.श्री.बी. जी. शेखर पाटील हे दिनांक 27/12/2023 ते दिनांक 30/12/2023 रोजी पावेतो नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी नंदुरबार येथे आले आहेत. दरम्यान त्यांनी दिनांक 27/12/2023 रोजी त्यांनी नवापूर पोलीस ठाणे येथे भेट दिली. त्यावेळी जिल्हा पोलीस दलाच्यावतीन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी. आर. पाटील यांनी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा.डॉ.श्री.बी.जी. शेखर पाटील यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. डॉ.श्री.बी.जी. शेखर पाटील यांनी नवापूर पोलीस ठाण्याचे आवार, परिसर पाहून पोलीस ठाण्यातील स्वच्छतेबाबत समाधान व्यक्त केले. नवापूर पोलीस ठाण्याचे गुन्हे अभिलेख, गोपनीय अभिलेख, शस्त्रागार, वाचनालय, व्यायामशाळा यांची पाहणी केली. त्याचप्रमाणे नवापूर पोलीस ठाण्याने वर्षभरात केलेल्या कामगिरीची तसेच पोलीस व जनता संबंध वृद्धी ंगत होण्यासाठी राबविलेले उपक्रम याबाबत सविस्तर माहिती घेतली. शस्त्रागाराची पाहणी केल्यानंतर पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी नियमीत गोळीबार सराव करण्याबाबत सांगितले.
त्यानंतर नवापूर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार करीत असलेल्या कामाचा आढावा घेवून त्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करुन प्रत्येक पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कायद्यात येणाऱ्या नवीन तरतूदींबाबत स्वतःला अद्यावत ठेवणेबाबत सूचना
केल्या. त्यानंतर वाचनालयाची पाहणी करुनपोलीस अधिकारी व अमंलदारांनी" नियमित वाचन केल्यास पुस्तकांचा प्रभाव आपल्या दैनंदिन जीवनावर वव्यक्तीमत्वावर होत असतो तसेच आपले ज्ञान वृद्धी ंगत होवून त्याचा उपयोग आपल्या दैनंदिन कामकाजात होत असतोत्यामुळे नियमीतपणे वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. तसेचपोलीसांना त्यांचे कर्तव्य पार पाडत असतांना आपले छंद देखील जोपासले पाहिजे म्हणून पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी आपल्या दैनंदिन कामकाजातून वाचनासाठी थोडा वेळ काढुन नियमीत वाचन केले पाहिजे असे सांगितले. त्याचप्रमाणे पोलीस दलाचे कामकाज हे आव्हानात्मक असून दैनंदिन कामकाज करतांना पोलीसांवर वेगवेगळ्या प्रकारे तणाव येत असतो. त्या शारीरिक व मानसिक तणावातून मार्ग काढून सकस आहार व योग्य व्यायाम याद्वारे आपण व्याधींपासून दूर राहू शकतो त्यामुळे दररोज दैनंदिन कामातून वेळ काढून नियमीत व्यायाम केला पाहिजे बाबत मार्गदर्शन केले. तसेच पोलीस ठाण्यात उपलब्ध असलेले वाचनालय, व्यायामशाळा यांचा पोलीस पाल्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी लाभ घ्यावा "असे आवाहनही यावेळी केले.
भेटी दरम्यान नवापूर पोलीस ठाण्यात असलेले सी.सी.टी.व्ही. कॅमेरे यांचा वापर वाढविण्याच्या सूचना देऊन पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले. पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याअडचणीबाबत विचारपूस करुन त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या निश्चितच सोडविल्या जातील असे यावेळी सांगितले.
त्यानंतर नंदुरबार उप विभागातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व दुय्यम अधिकारी यांच्या मुलाखती घेऊन नंदुरबार शहर, उपनगर, नंदुरबार तालुका, विसरवाडी पोलीस ठाण्याला दाखल गुन्ह्यांचा व पोलीस अधिकारी यांनी वर्षभरात केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला.
सदर वेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा.डॉ.श्री. बी.जी. शेखर पाटील, नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, नंदुरबार उपविभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय महाजन, विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे वाचक पोलीस उप अधीक्षक श्री. राजाराम ढिकले, नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानेश्वर वारे, स्थानिक गुन्हे शोखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर यांचेसह नवापूर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अमंलदारउपस्थित होते.
Tags:
शासकीय