शिक्षक मतदार संघातून शुभांगी ताई पाटील यांनी उमेदवारी करण्याची मागणी. उमेदवारीसाठी शिक्षकांकडून लोकवर्गणीची तयारी

जळगांव - सत्यप्रकाश न्युज 
 महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष आणि शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणाऱ्या लढाऊ नेत्या शुभांगी ताई पाटील यांनी नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून उमेदवारी करावी अशी आग्रही मागणी धुळे ,जळगाव, नंदुरबार ,नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षकांनी केली आहे. इतकेच नव्हे तर आता शुभांगी ताई यांनी निवडणूक लढविण्यासाठी शिक्षकांनी लोक वर्गणी देखील जमा करायला सुरुवात केली आहे.
    शिक्षक मतदार संघ हा बुद्धिमान व विचारवंत मतदारांचा मतदारसंघ आहे. असे असताना सुद्धा या मतदारसंघात कधी पैठणी वाटली जाते तर कधी पर्स, पाकीट वाटून मतदारांना प्रलोभणे दिली जातात. परंतु शुभांगी ताई पाटील या सामान्य शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांची जीवन जगण्याची कार्यपद्धती ही निस्वार्थ भावनेने आहे. गेल्या आठ ते दहा वर्षापासून त्या शिक्षण क्षेत्रात काम करत असून शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी लढत आहेत. त्यासाठी मोर्चे, आंदोलने उपोषणे व प्रसंगी आत्मदहना सारखे कठोर पावले उचलून देखील त्या शिक्षकांना न्याय मिळवून देतात. विविध आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी सुमारे 63 हजार विनाअनुदानित शिक्षकांना 20, 40, 60 टक्के पर्यंत वेतन अनुदान मिळवून दिले आहे. त्याचबरोबर शिक्षकांचे अनेक प्रश्न ज्या मध्ये दर महिन्याचा पगार वेळेवर होण्या पासून ते पेन्शन पर्यन्त आणि शालार्थ आई डी पासून ते मेडिकल बिलं पर्यन्त चे शिक्षण क्षेत्रातील असंख्य प्रश्न त्या चुटकीसरशी सोडवतात. त्यासाठी प्रसंगी शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव घालण्यापासून तर शिक्षणाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकण्या पर्यंत देखील ते मागे पुढे पाहत नाहीत. त्यांच्या या कार्यशैली मुळे त्या अल्पावधीत शिक्षण क्षेत्रात "शिक्षकांच्या मनातल्या ताई व गळ्यातल्या ताईत बनल्या आहेत". त्यामुळे त्यांनी आता शिक्षकांचे असंख्य प्रश्न मार्गी लागावे म्हणून विधानभवनात पोहोचणे महत्त्वाचे आहे. यासाठी त्यांनी सन 2024 मध्ये येऊ घातलेल्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून उमेदवारी करावी अशी मागणी शिक्षकातून जोर धरत आहे. परंतु नुकत्याच मागील वर्षी झालेल्या पदवीधर मतदारसंघात निवडणूक लढल्या मुळे पुन्हा एका वर्षात एका निवडणुकीला सामोरे जाणे आर्थिक दृष्ट्या शक्य नसल्याचे शुभांगी ताई सांगत असल्याने व त्यातच शुभांगी ताई कोणाकडूनही कोणत्याच कामाचे कधिच पैसे घेत नाहीत, ना स्वतः च्या नावाने, ना संघटनेच्या नावाने, त्यामुळे आता त्यांच्या उमेदवारीसाठी शिक्षकांनी स्वतः हुन लोकवर्गणी जमा करण्याचा निर्णय घेतला असून केवळ नाशिक विभागच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षका तून लोकवर्गणी जमवून निवडणूक फंड उभा करू व ताईंच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून शुभांगी ताईंना शिक्षक मतदार संघात कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी करण्यास भाग पाडून निवडून आणू व आता ताईंनी माघार घेऊ नये अशी विनंती सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षक मतदार बंधू भगिनी करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post