नवापूर सत्यप्रकाश न्युज
येथुन दुपारी 1-00 लाभ सुटणारी नवापूर -पुणे बसला कोंडाईबारी घाटात अपघात झाला असून सुमारे 22 प्रवासी जखमी झाले आहेत.
नवापूर येथुन दुपारची 1-00 वाजेची पुणे -नवापूर बस चिंचपाडा,विसरवाडी मार्गे पुणे येथे निघाली असता कोंडाईबारी घाटात उभ्या असलेल्या ट्रक ला ठोकून दिल्याने बस मधील 22 प्रवासी जखमी झाले असून या प्रवाशांना दहिवेल, विसरवाडी व साक्री येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वाहन चालक मोबाईल वर बोलत असताना घाटातील म़दिरा समोर उभा असलेला ट्रक कडे दुर्लक्ष झाल्याने बसने ट्रक ला धडक दिली व संपूर्ण चूकी बस चालकाची आहे असे प्रवाश्यांनी सांगितले, अपघाताचे वृत्त समजताच आगार व्यवस्थापक विजय पाटील व सहकारी घटनास्थळी रवाना झाले असून कोंडाईबारी घाटात असलेल्या पोलीस चौकीतील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जखमी प्रवाशांना यथायोग्य मदत केली व वाहतूक सुरळीत केली.
नवापूर आगारातील सर्व बसेस अत्यंत जुन्या झाल्या असून त्यांची हालत देखील दयनीय आहे.
एसटी महामंडळाने रस्ता सुरक्षा अभियान सुरू असुन नुकताच चालक दिन देखील साजरा करण्यात आला व या कार्यक्रमात उपस्थित चालक व वाहकांना सुचित करण्यात आले होते की वाहन चालवितांना शक्यतोवर मोबाईल फोनचा वापर करून नये तरी घाटात मोबाईल कानाला लावून गाडी चालवली जात आहे हा प्रकार योग्य नसुन कमीत कमी घाटात व रहदारी चा ठिकाणी तरी चालकांनी मोबाईल वापर बंद करावा अशी अपेक्षा प्रवाशी वर्गाकडून केली जात आहे.
Tags:
अपघात