नवापूर सत्यप्रकाश न्युज येथील श्रीमती प्र. अ. सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व हाजी ए. एम. व्होरा कनिष्ठ महाविद्यालयात महात्मा गांधी रिसर्च फाउंडेशनच्या वतीने घेतली जाणारी महात्मा गांधी विचार व संस्कार परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.
शाळेच्या इयत्ता पाचवी ते बारावीच्या एकूण 184 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सदर परीक्षेत शाळेचे एकूण पाच विद्यार्थी नंदुरबार जिल्ह्यात प्रथम आले. त्यांना गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देऊन गांधी रिसर्च फाउंडेशनच्या वतीने सन्मानीत करण्यात आले. यात कुमारी प्रांजल अल्केश अहिरे इयत्ता पाचवी, अश्विनता शंकर गावीत इयत्ता सहावी, पलवी सुरतान गावीत इयत्ता दहावी, कल्याणी केसा गावीत इयत्ता दहावी, नरगिस फयोजिद्दीन मकरानी इयत्ता अकरावी सदर विद्यार्थ्यांचा सत्कार दिनांक आठ जानेवारी रोजी गांधी रिसर्च फाउंडेशनच्या वतीने नंदुरबार जिल्ह्या स्तरावर श्रॉफ हायस्कूल नंदुरबार येथे करण्यात आला. तसेच बहुसंख्य विद्यार्थ्यांना परीक्षेत सहभाग घेऊन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करून वाचन संस्कृती जोपासल्याबद्दल गांधी रिसर्च फाउंडेशनच्या वतीने शाळेचे मा. प्राचार्य मिलिंद सर्जेराव वाघ सरांचा सन्मान करून त्यांना विशेष मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच मुख्य समन्वयक श्रीमती डॉ. योगिता पाटील यांनाही प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
गांधी विचार संस्कार परीक्षेत मिळालेल्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष विपीनभाई चोखावाला, कार्याध्यक्षा शीतलबेन वाणी, उपाध्यक्ष शिरीषभाई शाह, सचिव राजेंद्रभाई अग्रवाल, कोषाध्यक्ष सतीशभाई शाह, सर्व संचालक, उपमुख्याध्यापक नारायण मराठे, पर्यवेक्षक दीपक मंडलिक, कनिष्ठ महाविद्यालय विभागाच्या विभाग प्रमुख मेघा पाटील, शालेय परिवाराच्या वतीने सर्व यशस्वीतांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले..
Tags:
शैक्षणिक
Nice 👍👏👏
ReplyDelete