येथील केवळ जिल्हयातच नव्हे तर संपूर्ण राज्यात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या नवापूर एज्युकेशन सोसायटीने शिक्षण क्षेत्रात व
तालुक्याच्या वैभवात भर टाकणारा एक अभिनव प्रकल्प मल्टिपर्पज हॉल आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ष साकारणार असल्याची घोषणा नवापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्योगपती विपीनभाई चोखावाला यांनी एक तातडीची बैठक बोलावून केली आहे
३१ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता नवापूर एज्युकेशन सोसायटी च्या कार्यालयात अध्यक्ष विपीनभाई चोखावाला यांच्या अध्यक्षतेत एक तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला नवापूर एज्युकेशन सोसायटी संचालक मंडळ पदाधिकारी, सदस्य, सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व छात्रालय अधिक्षक उपस्थित होते.
बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले दानशूर व्यक्तिमत्व अमेरिकास्थित NRI श्री हरिषभाई वांडरा यांनी सदर प्रकल्पाला देणगी घोषित केली. या वेळी त्यांच्या अध्यक्ष विपीन भाई चोखावाला यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे.
जवळ जवळ दोन कोटी च्या वर खर्च करून साकारण्यात येणाऱ्या प्रकल्पाला विदेशात वास्तव्यास असलेले अनेक नवापुरकर दानशूर व्यक्तिमत्व असलेल्या पाहुण्यांनी मोठ्या प्रमाणात देणगी घोषित केली असून नवापूर एज्युकेशन सोसायटी च्या ह्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला लागणारा निधी मोठ्या प्रमाणात असल्याने नवापुरातील दानशूर नागरिकांनी ह्या प्रकल्पा साठी पुढे येउन सहकार्य करण्याचे आवाहन नवापूर एज्युकेशन सोसायटी कडून करण्यात आले आहे
या बैठकीत नवापूर एज्युकेशन सोसायटी संचलित बहूभाषिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जागे अभावी विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी सोसायटी संचलित शॉपिंग कॉम्प्लेक्ष मधील दुकाने खाली करून घेण्यासाठी न्यायालीयन लढाई सुरू असून दि. 30 जानेवारी रोजी नवापूर न्यायालयाने एकूण १४ पैकी ४ दुकानाचा निकाल सोसायटीच्या बाजूने दिल्याने ह्या निकालाचे व न्यायालयात लढा देत असलेले अभिव्यक्ता टिमोल यांचे टाळ्या वाजून स्वागत करण्यात आले तर नवापूर न्यायालयात आपण जिंकलो असलो तरी पुढची लढाई नंदुरबार न्यायालयात लढावी लागणार असल्याने संचालकांनी पुढील तयारी सुरू ठेवावी लागेल अशा सूचनाही या वेळी अध्यक्ष विपीनिभाई चोखावाला यांनी दिल्या आहेत.
Tags:
शैक्षणिक