नवापूर (सत्यप्रकाश न्युज)
विश्व हिंदू परिषद नवापूर जिल्हा नंदुरबार व हिंदू मेळावा आयोजन समिती नवापूर तर्फे ५ फेब्रुवारी सोमवार रोजी सायंकाळी पाच५ते७ ते या वेळेत भावनगर येथील प्रखर राष्ट्रवादी विचारवंत काजलबेन हिंदुस्थानी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती हिंदू मेळावा आयोजन समितीचे प्रमुख अनिल सुदाम पाटील सर यांनी दिली आहे. विश्व हिंदू परिषद नवापूर जिल्हा नंदूरबार व हिंदू मेळावा आयोजन समितीच्या वतीने दि ५फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता महात्मा गांधी पुतळ्यापासून श्री शिवाजी हायस्कूल पर्यंत भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शोभायात्रा नंतर सायंकाळी ६ ते ८ या वेळेत श्री शिवाजी हायस्कूल मैदानावर (बस स्थानक जवळ ) *काजलबेन हिंदुस्तानी यांचे जाहीर व्याख्यान व जाहीर भांडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे* .या हिंदू मेळाव्यात जास्तीत जास्त महिला, युवती ,युवक, पुरुषांनी सहभागी व्हावे असे आवाहन समिती प्रमुख अध्यक्ष अनिल सुदाम पाटील उपाध्यक्ष हरीश पाटील, पप्पू मावची, अक्षय धोडीया धाकू मोरे, अजय महावीरप्रसाद अग्रवाल, विकास शहा, अजय पाटील ,प्रकाश खैरनार, भैय्या चौधरी, मनोज अग्रवाल, कमलेश छत्रीवाला, दिपक भाई प्रजापत(मिस्री) प्रकाश पाटील, शाम चौधरी ,दिपूभाई जोशी, अजय परदेशी, रवी पाटील, तेजस वसावे ,पराग ठक्कर ,चंद्रकांत गावित, बबलू आतारकर, विक्की चौधरी पंकज गोसावी,सुधीर निकम, भैया पाटील जितेंद्र खत्री, चेतन प्रजापत, नाना गिरासे, धर्मेंद्र शर्मा, भटेश पाटील आदींनी केले आहे.
Tags:
धार्मिक