जिल्हा पोलिस दलाचा गोळीबार सराव 3 ते 9 फेब्रुवारी पर्यंत आयोजन

नंदुरबार सत्यप्रकाश न्युज 
    जिल्हा पोलीस दलाचा सन 2023-2024 वार्षिक गोळीबार सराव दि. 03/02/2024 ते दि. 09/02/2024 या कालावधीत नंदुरबार शहरातील बिलाडी रोड, ईदगाह मैदानाजवळ, नंदुरबार येथे घेण्याबाबत मा. जिल्हाधिकारी, नंदुरबार यांनी परवानगी दिली आहे. 
     मा. जिल्हाधिकारी, नंदुरबार यांचेकडील पत्र क्रमांक.-2024/ड/कक्ष-2/पीओएल/कावि-19, दि. 01/02/2024 अन्वये सदर प्रतिबंधित क्षेत्रात दि. 03/02/2024 ते दि. 09/02/2024 या कालावधीत गोळीबार सराव दरम्यान पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे व्यतिरिक्त कोणासही प्रवेश करण्यास मनाई आदेश जारी केलेला आहे.
त्याअनुषंगाने नंदुरबार जिल्हा व ईदगाह मैदानाजवळील भागातील नागरिकांना सूचित करण्यात येते की. दि.03/02/2024 ते दि. 09/02/2024 दरम्यान नमुद गोळीबार सरावादरम्यान प्रतिबंधित क्षेत्रात/परिसरात नागरिकांनी फिरू नये, गुरे चारणारे गुराखी यांनी देखील या भागात येऊ नये, तसेच मा. जिल्हाधिकारी, नंदुरबार यांनी जारी केलेल्या मनाई आदेशाचे पालन करावे व जिल्हा पोलीस दलास सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक श्रवण दत्त. एस भा.पो.से.यांनी केले आहे. 


Post a Comment

Previous Post Next Post