महाराष्ट्र राज्यातील विविध शैक्षणिक प्रश्नांसाठी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी घेतली शिक्षण आयुक्त सुरज मांढरे साहेब यांची भेट

मुंबई सत्यप्रकाश न्युज
   महाराष्ट्र राज्यातील शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींच्या विविध समस्यांसाठी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी यांनी शिक्षण आयुक्त माननीय सुरेश मांढरे साहेब यांची भेट घेतली
        *्अनेक दिवसापासून प्रलंबित संच मान्यता दुरुस्ती लवकरात लवकर झाल्या पाहिजेत, 20% अनुदान मंजूर झालेल्या शाळांना राज्यातील अनेक शिक्षणाधिकाऱ्यांनी अनुदानाचे आदेश छोट्या छोट्या त्रुटी लावून दिले नाहीत, आदेश देण्याची व्यवस्था करावी, अघोषित शाळांचे प्रस्ताव मंत्रालयात सादर झालेले आहेत, पुणे विभागातील शालार्थ आयडी तात्काळ मिळाले पाहिजेत, सेवा जेष्ठते संदर्भात आयुक्तांनी स्पष्ट आदेश दिले पाहिजेत, कोकण विभागातील तसेच राज्यातील अंशतः अनुदानित थकलेले पगार त्वरित झाले पाहिजे, थकीत बिले,मेडिकल मेडिकल बिलांसाठी निधी मंजूर झाली पाहिजेत, अर्धवेळ शिक्षकांना शालार्थ आयडी नसल्याने ऑफलाइन पद्धतीने बिल काढली पाहिजेत, नवीन संच मान्यतेतील निकष बदलावेत, इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली 
    सोबत महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जेके पाटील सल्लागार अरुण थोरात , आदिनाथ थोरात , आर डी निकम ,प्रवक्ते गनफुले, कोषाध्यक्ष संदेश राऊत , हरिश्चंद्र गायकवाड, प्रसाद गायकवाड, सुनील जगताप रामनाथ इथापे, म्हसरे  तसेच समस्या घेऊन आले अनेक शिक्षक शिक्षकेतर बांधव उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post