8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त विशेष लेख
!! यत्र नार्यस्तू पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवतः !!
जेथे नारीची पूजा होते, सन्मान केला जातो तिथेच देवता वास करतात रमतात .
दरवर्षी 8 मार्च हा दिवस संपूर्ण जगभरात महिलादिन म्हणून महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढयाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो .
भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला . ८ मार्च १९७१ ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता . पुढे १९७५ हे वर्ष युनोने जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले .
त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या . स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली . बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले . तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या .
एकोणिसाव्या शतकात जगभरातील स्त्री वादी चळवळीने जोर धरला होता . त्याचवेळी भारतातही अनेक समाज धुरीणांनी स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली.
स्वराज्य स्थापन करण्यासाठी जिजाऊ मातेने शिवबांना साथ दिली. सावित्रीने हाती शिक्षणाची मशाल घेऊन ज्योत ज्ञानाची लावली . लेकी सुनांना शिक्षण देण्या सावित्री झटली . अशा पहिल्या महिला शिक्षिकेचा मला सार्थ अभिमान आहे. महिलांच्या प्रगती बाबत बोलतांना डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात . आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती आपण सुधारत असाल आणि महिलांना आहे त्या स्थितीत ठेवत असू तर देशाचा विकास होणार नाही . महिलांचे प्रश्न आधी सोडवले पाहिजे. महिलांविषयीचे विचार किती प्रगल्भ आणि उच्च कोटीचे आहेत हे यातून लक्षात येते . या देशातल्या प्रत्येक स्त्रीला हक्क, अधिकार, दर्जा व प्रतिष्ठा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिली आहे .
राजाराम मोहन रॉय, महर्षी कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले ईश्वरचंद्र विद्यासागर, रमाबाई रानडे ही नावे विसरून चालणार नाहीत .
मूळात नोकरीसाठी स्वेच्छेने अथवा परिस्थितीमूळे घराबाहेर पडलेल्या स्त्रियांना नोकरीच्या ठिकाणी असलेली लिंग विषमता खटकू लागली . पुरुषांइतकेच काम करूनही वेतनात समानता नव्हती किंवा समान संधीही उपलब्ध नव्हत्या आणि मग आपल्या हक्कांबाबत स्त्रिया जागृत होऊ लागल्या . स्त्रियांचे आत्मभान जागृत करण्याचे मोलाचे काम ज्यांनी केले . त्या सर्व स्त्रियांच्या योगदानाबद्दल आपण सदैव कृतज्ञ असणे आवश्यक आहे .
Contact 9403125928
अजुनही बऱ्याच कुटूंबात 'ती' जन्मली तर आनंद होत नसतो . मुलगाच जन्माला यायला हवा ही संकल्पना पूर्णतः नाहीशी झालेली नाही . वंशाचा दिवा म्हणून मुलाकडे जास्त लक्ष दिले जाते . परंतु मुलगीही काही कमी नसते . महिलांनी पुरुषांपेक्षा अधिक सक्षम व उत्तम आहोत हे वेळोवेळी सिद्ध केले आहे . संपूर्ण विश्व आता भारतीय महिलांचे सामर्थ्य व योग्यता स्वीकारत आहे . म्हणून प्रत्येक स्त्रीने आपण कुठेच कमी नाही . ही भावना ठेवून वाटचाल केली पाहिजे आणि स्वतःचा आत्मसन्मान स्वतःच वाढवला पाहिजे .
आजही आपण वर्तमानपत्र, टिव्हीवरील बातम्या, मोबाईल इ . द्वारे महिला, लहान मुलींवर अन्याय, अत्याचार होतांना पहातो . या सर्व गोष्टींमागे पुरुषाच्या लेखी बाईचे असलेले दुय्यम स्थान, तिच्यावर त्याने प्रस्थापित केलेला मालकी हक्कच कारणीभूत आहे . स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना घडल्यावर त्याचे पडसाद वेगवेगळ्या स्तरांवर उमटतात . पण त्या घटना होऊ नयेत म्हणून जनजागृती होणे अजूनही गरजेचे आहे . भारतीय संविधानाने महिलांना स्वातंत्र्य बहाल केले आहे कायदयामूळे हक्क व कर्तव्याची जाण आली आहे . त्यातून काही अंशी समाज जागृत झाला असला तरी महिलांचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत .
स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन अजूनही बदललेला नाही .
एकीकडे महिला दिन जल्लोषात साजरा करायचा अन् दुसरीकडे वर्षभर तीने अन्याय सहन करत जीवन जगायचे . हे कुठेतरी थांबायला हवे .
देशातील व परदेशातील सर्वोच्च पदावर आरुढ होणाऱ्या महिलांना अनेक आव्हाने आणि संघर्ष यांना तोंड द्यावे लागले आहे . सामाजिक कार्य व सुधारणा करणाऱ्या, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनाही वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर संघर्ष करून आपले यशाचे शिखर गाठावे लागले आहे .
Contact 9403125928
स्त्री कालची आणि आजची कशीही असली तरी नात्याचं हे तलम वस्त्र विणणाऱ्या ईश्वराचे आणि त्याने सृष्टीबरोबरच निर्माण केलेल्या या अपूर्व कलाकृतीचे आभार मानायलाच हवेत . स्त्री कालची वा आजची ती प्रत्येक नात्याला सांभाळत असतेच . यात जे नातं तिचं स्वतःशी असतं ते ती शोधत असते .'स्व' शी संवाद साधते .
साऱ्या गुंतागुंतीत स्त्रीचं असणं - नसणं
पुरुषाला फार जाणवत नसेलही कदाचित....
पण तिच्याविना प्रत्येक गोष्ट अपूर्ण असते .
असं कोणतेही क्षेत्र नाही की स्त्री आपली कामगिरी चोख बजावत आहे . तिची प्रत्येक क्षेत्रातील भरारी पाहून उर भरून येते . पण दुसरीकडे चित्र काय आहे . तळागाळातील, खेडयापाड्यातील, दुर्गम भागातील महिलेपर्यंत हे मुक्तीचे वारे गेले आहेत का ? तिचे आर्थिक सक्षमीकरण झाले आहे का ? अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आज निर्माण झाली आहे .
प्रबोधनाच्या पातळीवर स्त्रियांच्या समान दर्जाचा प्रश्न अत्यंत संवेदनक्षम पद्धतीने परंतू , ठामपणे मांडला गेला पाहिजे . स्त्रिया मुळातच सबला असतात किंवा अबला असतात . अशा चुकीच्या भूमिका न घेता जात, धर्म, वर्ग यांप्रमाणेच स्त्री- पुरुष विषमता घडविली जाते . त्यात नैसर्गिक असे काही नसते यावर भर दिला पाहिजे
Contact 9403125928
कष्टकरी स्त्री म्हणजे घराबाहेर पडून पूर्णवेळ काम करणाऱ्या सर्व स्त्रियांना सक्षम होण्यासाठी काही किमान सोयीसुविधा आवश्यक आहेत .
तरुण मुली आणि बालिका यांच्यासाठी भरीव प्रयत्न होणे आवश्यक आहे . सकस आहार व आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे .
बेरोजगार तरुणांच्या टोळ्या गुंडगिरी करत फिरत राहिल्या तर स्त्रियांच्या सक्षमीकरणाचे, सबलीकरणाचे सर्व प्रयत्न फोल ठरतील .
प्रत्येकजण महिला दिनाच्या दिवशी शुभेच्छा देत असतात . स्त्रीचा त्याग, समर्पण, महानतेच्या भरगच्च बिरुदावल्या बहाल करतात .
परंतू दुसरा दिवस उजाडतो .
तेव्हा तिच्या आनंदाचा पूर ओसरत चाललेला असतो . आज महिला दिनाच्या निमित्ताने सांगण्याचा प्रयत्न एवढाच की महिलांना वर्षभर प्रेमाची वागणूक, सन्मान हवा . तिच्या अडचणीच्या ठिकाणी मदतीचा हात हवा.
शब्दांकन - श्रीमती सुरेखा कृष्णा खैरनार
कै एस व्ही ठकार माध्यमिक विदयालय, धडगाव ता धडगाव जि . नंदूरबार
Tags:
सामाजिक