नवापूर(सत्यप्रकाश न्युज):-
तालुक्यातील मौजे आमपाडा येथे एकूण पाच रस्त्यावर नवीन पेव्हर ब्लॉक बसविणे, ग्रामपंचायत धुळीपाडा येथे भाथीजी महाराज मंदिराजवळ आणि आंबाफळी चर्च जवळ पेव्हर ब्लॉक बसविणे व ग्रामपंचायत चौकी येथे एकूण आठ रस्त्यावर नवीन पेव्हर ब्लॉक बसविणे या विकास कामाचे भूमिपूजन नंदुरबार जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती सौ.संगीता भरत गावीत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी नवापुर पंचायत समिती सभापती दिलीप गावित, लता गावित, आमपाडा माजी सरपंच रमिला गावित, धुळीपाडा सरपंच उमेश गावीत, चौकी सरपंच सुनील गावीत, यशवंत गावित, आयुब गावीत, अरविंद गावित, वसंत गावीत, सांग्या गावित, महादु गावीत तसेच आमपाडा, चौकी, धुळीपाडा या तिन्ही ग्रामपंचायतीचे सदस्य यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमपाडा, चौकी आणि धुळीपाडा ग्रामपंचायत अंतर्गत विकास कामे मंजूर करून दिल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य भरत गावित व सौ.संगीता गावीत यांचे तिघ्या ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच, ग्रा.पं.सदस्य व ग्रामस्थ यांनी आभार व्यक्त केले.
Tags:
सामाजिक