उपजिल्हा रुग्णालयाच्या - वैद्यकिय अधिक्षक पदाच्या डाँ अनिल गावीत यांनी नुकताच कार्यभार सांभाळला आहे. डाँ शशिकांत वसावे यांनी डाँ अनिल गावीत यांच्या शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार केला. यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, नर्स व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. अनिल गावित यांनी यापूर्वी ,धानोरा, नंदुरबार सह नवापूर उपजिल्हा रुग्णालयात चांगले काम केले. गेल्या काही वर्षापासून ते नंदुरबार जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. डॉ.अनिल गावित हे नवापूर शास्त्रीनगर भागातील रहिवासी असून रूग्ण सेवेत त्यांची उत्तम व
लोकप्रिय वैद्यकीय अधिकारी म्हणुन ओळखले जातात. त्यांच्या सामाजिक , धार्मिक,जनसंपर्क दांडगा असुन. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहे.
Tags:
यश/ निवड