शिक्षकांच्या थकीत फरक बिलांसाठी अतिरिक्त निधी. बिले अदा करण्यास सुरुवात

शुभांगी ताई पाटील यांच्या प्रयत्नांना यश
  धुळे सत्यप्रकाश न्युज
    राज्यातील शिक्षक व प्राध्यापकांचे वेगवेगळ्या प्रकारचे फरक बिले मागील अनेक महिने पासून नाही तर वर्षांपासून शासनाकडे प्रलंबित होते. या संदर्भात महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष , तथा शिवसेना उपनेते शुभांगी ताई पाटील या सतत पाठपुरावा करत होत्या. स्वतः शुभांगी ताई पाटील यांनी यासंदर्भात राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे सो यांच्याकडे वेळोवेळी मीटिंग करून  या संदर्भात चर्चा केली होती. तसेच राज्याच्या शिक्षण संचालकांकडे पाठपुरावा केला असता असे लक्षात आले होते की सदरची बिले ही मंत्रालय स्तरावर वित्त विभागाकडे प्रलंबित आहेत. त्यावेळी स्वतः शुभांगी ताई पाटील यांनी वित्त विभागाकडे पाठपुरावा करून शिक्षकांच्या थकीत फरक बिलांसाठी तसेच थकीत मेडिकल बिलांसाठी व इतर बिलांसाठी पाठपुरावा केला या बिलांसाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्याने त्यासाठी शासनाकडे मागणी करून थकीत फरक बिलासाठी अतिरिक्त निधी मंजूर करून घेतला. या निधीतून गेल्याच महिन्यात व मागील काही दिवसांपूर्वी देखील पाठपुरावा करून फरक बिलांची रक्कम व इतर बिलांची रक्कम जिल्हा स्तरावर देण्यास सांगितले. त्यानुसार फरक बिलासाठी ची अतिरिक्त रक्कम नुकतीच जिल्हास्तरावर देण्यात आली असून, काही जिल्ह्यांमध्ये ही फरक बिले अदा करण्यात आलेली आहेत व उर्वरित जिल्ह्याचे शिक्षकांचे फरक बिले येत्या दोन-तीन दिवसात मिळणार आहेत. त्याचप्रमाणे अंशतः अनुदानित शिक्षकांचे 20 टक्के 40 टक्के 60 टक्के चे नियमित पगारां चां देखिल प्रश्न प्रलंबित होता तो प्रश्न देखील शुभांगी ताईंनी अतिरिक्त निधी आणून या शिक्षकांचे प्रश्न सोडवले आहेत. व ही बिले शिक्षण  विभागाकडून अदा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. त्याबद्दल शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे

Post a Comment

Previous Post Next Post