जगातील सर्वोच्च स्थान असलेला घटक म्हणून शिक्षकाला पाहिले जाते, शिक्षकांचा सन्मान वाढवा म्हणून डॉक्टरांच्या नावासमोर "Dr', इंजिनीयर च्या नावासमोर "Eg", वकिलाच्या नावासमोर "Ad" सिम्बॉल लावला जातो.तसाच सिम्बॉल शिक्षकांच्या नावासमोर "Tr" लावला जावा जेणेकरून घरावरची पाटी किंवा गाडीवर सदर सिम्बॉल लावण्याची परवानगी मिळाल्यास शिक्षकाची ओळख पटकन पटेल व सामाजिक स्तरावर वावरताना नेहमीच आदरपूर्वक सन्मान मिळेल, हा उद्देश लक्षात ठेवून आ. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर साहेब यांच्याकडे निवेदन ही दिले होते व सतत पाठपुरावा केलेला होता आणि शिक्षण मंत्री स्वतःहून सदर सिम्बॉल शिक्षकांना मिळावा म्हणून प्रयत्न करत होते, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार , व सर्व मंत्रिमंडळाने शिक्षकांच्या सन्मानासाठी सदर सिम्बॉल चा "Tr "आदेश पारित करून शिक्षकांच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला आहे.
त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांचे सर्व स्तरातून आभार व्यक्त केले जात आहेत.