संगीत असा एक विषय आहे की त्याचा योग्य प्रकारे सराव केल्यास भविष्यात त्याचा लाभ निश्चितच मिळतो असे मत अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई संचलित, सुर रत्न संगीत विद्यालय नवापूर या ठिकाणी संगीत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, मेडल व ट्रॉफी वितरण समारंभात शहरातील उदयोजीका व नवापूर एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा सौ.शितल वाणी यांनी केले .
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेचे पुजन करून दिपप्रज्वलनाने करण्यात आली सौ अर्चना धोत्रे यांनी ईशस्तवन सादर केले तर बाळकिसन ठोंबरे, यांच्या स्वागत गीताने करण्यात आली .
याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. तेजलबेन चोखावाला , गणेश शिंपी, संचालिका सौ.रत्ना रामोळे, सत्यप्रकाश न्युज चे संपादक प्रकाश खैरनार आदि प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात शितल बेन वाणी पुढे म्हणालया की आपण संगीताचे धडे व्यावसायिक नसुन भविष्यात देखील महत्वाचे आहेत. आपण भाग्यशाली आहात की नवापूरात संगीत विद्यालय आहे व भानुदास रामोळे व सौ रत्ना रामोळे सारखे अनुभवी उत्तम मार्गदर्शक आहे जे आपल्याला सहकार्य करतात व नेहमीच तुमच्या पाठीशी उभे असतात मला एका परिक्षेसाठी पाच ठिकाणी फिरावे लागले तरी स्वप्न अपूर्ण राहिले स़ंगीताचे गुण पुढील शिक्षणासाठी देखील उपयोगी पडतात, एवढ्या वर न थांबता संगीताची नियमित रियाज करा आणि पुढच्या वाटचालीसाठी उपयोग करून फायदा घ्या जेणेकरून भविष्यात त्याचा निश्चितच फायदा होईल.
प्रमुख अतिथी प्रकाश खैरनार यांनी आपल्या मनोगतात संगीत विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याचा सराव करा यश नक्कीच मिळेल.परिक्षार्थी व जि.प.शिक्षक विजय साळवे यांनी जीवनात संगीत विषयाचे किती महत्त्व आहे ते समजून सांगितले व नवीन शैक्षणिक धोरणात सुरू होणाऱ्या व्यावसायिक शिक्षणात संगीत विषयाचा समावेश असणार आहे.हाबेल गावीत यांनी संगीतात वापरल्या जाणाऱ्या विविध वाद्यांचे प्रकार सांगुन त्यांची ओळख करून दिली.प्रा.सौ.कविता खैरनार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की जीवनात छंद जोपासला गेला पाहिजे मग तो चित्रकला,गायन,वादन, लेखन पैकी कोणताहि असो म्हणजे माणूस एकटा पडत नाही आणि संगीत असा विषय आहे जो एकटे पडु देत नाही.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये नवापूर शहरातील, तसेच जि.प.शाळा वासरवेल, जि.प.शाळा बोरझर, हाबेल गावीत संगीत क्लास नवापूर येथील विद्यार्थ्यांचा समावेश होता.
*प्रारंभिक परीक्षा*
हर्ष खैरनार, देवांशी गावीत, ग्रेसी गावीत, पिनलबेन गामीत, एंजल नाईक, सृष्टी माळचे, दुर्गेश पुराणिक, प्रिया नाईक, प्रतीक गावीत, क्रिस वसावा, कुश शिंदे, साहिल कटारिया, रितेश वसावे जस्मिता दिवटे, प्राजक्ता गावीत, आराध्या साळवे, मार्टिन गावीत, लोकेश पाटील, सोहम घोळवे, अनुष्का मुंडे, हाबेल गावीत, आरुषी गावीत, कार्तिक गावीत, आयुषी गावीत, आराध्या गावीत
प्रवेशिका प्रथम परीक्षा
वेदिका चव्हाण, पंक्ती वाला, स्वरांगी वसिष्ठ, श्रेया सोनार, अनुष्का भदाणे, मोनेश सोनवणे, निखिल नाईक, क्रिश बच्छाव, प्रिन्स गावीत, धनंजय गावीत, श्लोक साळवे, ईशा ढोणे, स्टीपन गावीत, प्रणिता गावीत, एंजल गावीत, आरोही गावीत, निखिल गावीत, तनय गावीत
प्रवेशिका पूर्ण परीक्षा
विजय साळवे
मध्यमा प्रथम परीक्षा
चेतन खैरनार, कुशल कुमार माळी
मध्यमा पूर्ण परीक्षा
संगीता भामरे, अर्चना धोत्रे,
गौरी खैरनार, राज चव्हाण
कार्यक्रमाचे आयोजन कौस्तुभ रामोळे, संचालिका रत्ना रामोळे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भानुदास रामोळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी होण्यासाठी पंक्ती, स्वरांगी, लोकेश, सोहम यांनी परिश्रम घेतले. पालक वर्गात आनंद वसिष्ठ, जितेंद्र गावीत, प्रकाश शिंदे, सपना पाटील, अश्विनी गावीत, समुवेल गावीत,विजय पुराणिक, राहुल गावीत, रामदास घोळवे, सौ.वाला, मदन मुंडे, सौ.पाटील, सौ.ढोणे, इसाप गावीत, महिमा गावीत, अनिता गावीत, अमोल गावीत तर शिक्षक वृंदामध्ये वंदना मावची, विजय साळवे, हाबेल गावीत, ताई गावीत, भानुदास रामोळे उपस्थित होते.
Tags:
शैक्षणिक