तालुक्यातील पिंपळनेर व सामोडे जवळील धंगाई देवी यात्रा महोत्सव दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी श्री दुर्गासप्तशती पाठ वाचन व स्वच्छता अभियान तसेच श्री दुर्गासप्तशती पाठ हवन होणार आहे. तसेच सकाळी आठ वाजता गावातून देवीची वाजत गाजत मिरवणूक निघणार आहे. त्याच दिवशी सकाळी नऊ वाजता श्री दुर्गासप्तशती पाठ हवन होणार आहे.
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दत्तनगर सामोडे, पिंपळनेर व कुलस्वामिनी धंगाई देवी मंदिर समिती यांच्या संयुक्त उपक्रमातुन तालुका साक्री जिल्हा धुळे येथे गुरूमाऊली व दादासाहेब यांच्या कृपाआशिर्वादाने ग्राम अभियान दिनांक 23 एप्रिल 2024 वार मंगळवार कुलस्वामिनी श्री धंगाई माता मंदिरातुन तसेच सकाळी 8.00 वाजता वाजत गाजत मिरवणूक निघणार आहे. त्याच दिवशी श्री दुर्गासप्तशती पाठ वाचन वेळ सकाळी 9.00 वा. होणार तसेच मंदिर व परिसर स्वच्छता अभियान करणार आहेत. तसेच धंगाई देवी सेवाभावी ट्रस्ट
कै. शकुतला बाई विश्वासराव मराठे सभा गृहाचे उदघाटन सोहळा दिनांक 23/4/2025 रोजी सकळी 10.00 निवृत्त अभियंता व्ही.एन. मराठे यांच्या हस्ते होणार आहे. तरी सर्व कुलभक्ता या कार्यक्रमस उपस्थित राहावे.
ह्या सेवेसाठी परिसरातील भाविक भक्तांना तसेच सर्व कुळभक्तानां जाहिर आव्हान करण्यात येते की प्रत्येक कुटूंबाने या सेवेत सहभागी व्हावे. व ज्यांना या सेवेत सहभाग घेण्यास इच्छा असेल त्यांनी विजयकुमार जगन्नाथ खैरनार 9421569708 , डॉ. विवेकानंद शिंदे 94239 41488 , संजय खैरनार ,(वांसदेकर,) 8308596773 , डॉ. मिना विवेकानंद शिंदे 75592 57062 , यांना संपर्क करावा.
Tags:
धार्मिक