येथे श्रीराम जन्मोत्सवानिमित्त आज सायंकाळी महिलांची मोटारसायकल रॅली श्रीराम मंदीरापासुन काढण्यात आली. रॅलीमध्ये जि.प महिला बालकल्याण सभापती संगिता गावीत उपस्थित होत्या.
सदर मोटर सायकल रैली श्रीराम मंदीर, शिवाजी रोड, शितल सोसायटी, लाईट बाजार, शास्त्री नगर, जनता पार्क, मंगलदास पार्क, श्री साईबाबा मंदीर रोड, बसस्थानक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, गुजर गल्ली या मार्गाने नेण्यात येवून श्रीराम मंदीर येथे सांगता करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अँड. जितेंद्र दुसाने, उपाध्यक्ष शंकप दर्जी व उत्सव समितीचे पदधिकारी यांनी परीश्रम घेतले, याप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता
Tags:
धार्मिक