आरोग्य धनसंपदा,आजिबाईचा बटवा
विषय - झोप.
आरोग्य धनसंपदा ग्रुप आज शरिराला झोप अत्यंत महत्त्वाची असते.या विषयावर थोडं सर्व
सामान्य माहिती घेणार आहोत.
प्रश्नकर्ते - सौ. विजया जोशी
काळा तलाव.कल्याण.
झोप - जगी सुखी असा कोण आहे ! विचारी मना तू शोधुन पाहे !!* जो माणुस अंथरुणावर पडताचं शुन्य मिनिटात झोपतो.त्यात तो लगेच घोरतो,तो खरां सुखी माणुस असतो. एका पाहणीनुसार ५ पैकी १ माणुस दिवसातून फक्त ४/५ तासा
पेक्षा कमी झोपतो.जगात झोपेपा
सुन वंचित रहाणार्या देशात भारता
चा दुसरा क्रमांक आहे.प्रथम स्थानावर जपान आहे.
आपण आपल्या दैनंदिन
जिवनामधे तारुण्याअवस्थेत नेहमी
२४ तासापैकी ७! ते ७!! तास गाढ ,निद्रिस्त असे झोपणे ,आरोग्य
दृष्टीने फारच सुदंर असते.बदलले
ल्या जिवनपध्दतीमधे एखादी व्यक्ती मानसिक ,वैचारिक ,जिवन
जगत असल्यास त्याला त्याच्या शरिरावर वाईट परिणाम निर्माण होतात,त्यामुळं व्यक्तीने अंदाजे ६!! ते ८ तासांत परिपुर्ण झोपणे महत्त्वाचे आहे.पण कधी कधी
रोजचा व्यवसाय,नोकरी,इतर कामे यामुळे झोप कमीअधिक लागते.त्याचा वाईट परिणाम आपल्या दैनिक आरोग्यावर होतो.म्हणजे शरिरातिल इंद्रियांना
आवश्यक असलेली विश्रांती देऊन
स्वतःची प्रतिकारशक्ती चांगल्या
झोपेमुळेच तयार होते.आपलं शरिरात एनर्जी तयार होते.त्यामुळे आपण दैनंदिन कामं,कर्तव्ये करत
असतो.त्यामुळे शरिर गाढ झोपेच्या टप्प्यात जाण्यासाठी स्वतःला सज्ज असते.तेव्हा हृदयाची गति आणि रक्तदाब कमी होतो.कधीकधी दिर्घकाळ झोपले
तरी फ्रेश वाटत नाही.किंवा एखाद्या वेळेस सतत सारखी झोप येते.आणि कधी साधारणपणे विचार,टेन्शन ,वैचारिक ,असमाधान,आठवणी येत असल्याने पाहिजे तशी झोप लागत नाही.त्याला आपणं निद्रानाश ,स्लिप एपनियाँ
म्हणतो,हे डिहायड्रेशनमुळेही होऊ
शकते.
कधिही झोपतांना डाव्या कुशीवर झोपावे.झोप शरिराच्या प्रत्येक अवयवांना आराम देते,झोपेमुळे शरिरासह मन,बुध्दी ,
आणि इतर इद्रियांना आराम मिळ
तो.दुसऱ्या दिवशी सकाळी अतिश
य फ्रेश,ताजेतवाने वाटते.ऊर्जा
मिळते.एखाद्या दिवशी मनातिल
तमोगुण,विचार,संताप जास्तच
वाढला तर मानसिकता खराब होऊन लवकर झोप लागत नाही.
त्याविरोधी नेहमीपेक्षा जास्त झोप घेतली तर शरिराचे पोषण निट होत नाही.अपचन होते.अँसिडिटी वाढते.डोके दुखते,अंगात वेदना होतात.मनस्वास्थ बिघडते.रक्तदाब कमी.अधिक होतो.अशक्तपणा वाढतो,
मस्तकाच्या मधोमध आद्न्या
चक्रावर विचार सकारात्मक करित
बसले तर त्याला ध्यान म्हणतात.
शरिर निरोगी रहाण्यास झोपेसा
ठी अशी ध्यानधारणा केली.तर मन शुद्ध .सुदंर.सकारात्मक,बनते.
आयुर्वेदा प्रमाणे झोपे तिन प्रकार
१) स्वाभाविक झोप - हि नियमि
त झोप असते,अंथरूणावर पडल्यावर सहज लागते.
२) तामसी झोप - ऊठल्यावर माणुस पुन्हा झोपतो.झोपेत संताप
चिडचिडपणा करतो.संशयी असतो.मन समाधान नाही.हि झोप वाईट असते,आळशीपणा
निर्माण होतो.व्यसन लागते,मन बेचैन होते,
३) विकारी झोप - सतत आजारीपणा,थकवा वाटते.अंग दुखते.सतत वेदना सुरुच असतात.
ह्यामुळे आळशीपणा येतो.झोप येत नसेल तर शरिराची शक्ती
कमी होते.माणसाला कोणताही आजार होऊ शकतो.थकवा येतो,
झोप न येणे,हि एक मोठी समस्या असते,गादी कितीही मऊ असो,हवेत कितीही गारवा असो,
तरी आत्मिक समाधान,वैचारिक
ता,भावनांचा अभाव असेल तर झोप येतच नाही.याला असंतुष्ट मनोविकार समजतात,
झोपतांना उत्तरेकडे तोंड करु नये.झोपण्याआधी पाणी भर
पुर प्यावे,तोडांत पाण्याची एक चुळ भरावी.तोंड स्वच्छ करावे,चित्ते आणि पालथे कधीही झोपू नये .कोणत्याही एका डावी,
उजव्या कुशीवर झोपावे.एक हाथ सरळ ऊषीजवळ अलगद ठेवावा
दिर्घ श्वास घ्यावा,भ्रामरी व्यायाम
करावा,कधी ओंकार जप करावा,
भुतकाळचा विचार न करता वर्तमा
न काळातून भविष्यकाळात जाऊन चिरकालिन तारुण्याचा
,निरोगी पणाचा,करोडपती होण्या
चा,सत्कर्मकरुन पुढील आयुष्यात
घडणाऱ्या गोड गोष्टींचा विचार करावा.*मनी दिसे ते स्वप्नी वसे*.
यामुळे सुदंर झोप लागते.
झोपेचा परिणाम थेट आपल्या
हृदयावर होत असतो.एका मिनिटात हृदयाचे ठोके सुमारे १ लाख वेळा सुमारे सरासरी ७० बिट् स प्रति मिनिट असतात,एवढ्
या प्रयत्नानंतर हृदयाला विश्रांती
मिळते.म्हणजेच झोपेच्या काही तासांत,जेथे हृदयाचे ठोके कमी
होऊन हृदयाला थोडा हळूहळू
आराम मिळतो.पण जर एखाद्या
वेळी काही कारणास्तव झोपेच्या कमतरतेमुळे हृदय विश्रांती पासुन दुर राहिल्यास आपणांस अचानक
*हृदयाचा मोठा झटका अँटँक्स,
स्ट्रोक येऊन* मरणांसन्न अवस्था निर्माण होतो.
निरोगी शरिरासाठी जिवनात
झोप फार महत्त्वाची असते.आपण झोप किती घ्यावी.कधी घ्यावी.
कोणी घ्यावी.याविषयी नँशनल स्लिप फाँऊडेशन यांची काही मार्ग
दर्शक तत्वे आहेत.झोप प्रत्येकाच्
या वयाप्रमाणे अवलंबून असते.
खरं म्हणजे झोपेचा कोणताही
कालावधी परिपुर्ण कालावधी नसतो.तो विविध घटकांवर.घटनेवर अवलंबून असतो.
१) नवजात बालकं ( वय ० ते
३ महिने ) - जन्म घेतलेल्या बाळास त्याच्या जलद मानसिक आणि शारिरीक विकासासाठी
प्रौढापेक्षा जास्त झोपेची गरज
असते.नवजात बालकास दररोज
१४ते १७ तास झोप पाहिजे.
२)शिशुबाळ ( वय ४ ते ११
महिने) - चौथ्या महिन्यानतंर बाळा
च्या झोपण्याच्या पध्दतीत बदल
होत असतो, आता बाळ हातपाय
हलवतो.इकडेतिकडे बघतो,ऐकतो
बाळ कुरकुर करतो,जरा जास्त वेळ जागे रहातो.या कालावधीस
चार महिन्याचे प्रतिगमन असे
म्हणतात.याच काळात बाळ १२
ते १५ तास झोपते,
३) बाळ ( वय १ ते २ वर्ष )--
या वयात सर्वसाधारणपणे ११ ते १४ तास झोप असावी,यावयानतंर
हळूहळू झोप कमी होत असते.
४) मुलगा ( वय ३ ते ५ वर्ष)--
या वयात झोप फक्त १० ते ११ तास असावी.
५) शालेय वय (६ ते १३ वर्ष)-
या शैक्षणिक वर्षामधे अभ्यास.गृह
पाठ,खेळणे,फिरणे,यात मुलं व्यस्त असतात.झोप फक्त ९ ते १० तास असावी.
६) किशोर वयीन मुलं ( वय १४ ते १७ वर्ष ) -- या वयात दैनदि
न झोप फक्त ८ ते १० तास असा
वी .खेळणे,अभ्यास स्मरणशक्ती वाढ,बुध्दींक वाढ,अनुकरण करणे.
काही मुलं रात्री उशिरापर्यत खेळतात.
७)प्रौढ १ ( वय १८ ते २५ वर्ष ) -- दररोज दैनंदिन झोप ७ ते ९ तास महत्त्वाची असावी.
८) प्रौढ २ (वय २६ ते ६४ वर्ष) -- दररोज ७!! ते ९ तास झोप असावी.पुरेशी झोप न येणे.हार्मोन्स.वृध्दत्व मुळे अशक्तप
णा वाढतो.शरिर क्षिण होते.
९) वृध्द ( वय ६५ ते + ) --
अनेक वृध्दांना गरजेपेक्षा झोप कमी लागते.उतार वयातिल काळजी.पश्चाताप,असमाधान.
वैचारिकता,कमी ऐकु येणे.शारिरी
क व्याधी ,अशक्तपणा ,एखाद्या
आजार,टेन्शन यामुळे झोप कमी होते,५ ते ६ तास झोप लागते,पुरे
शी झोप होत नाही.तरीही दररोज ७!! ते ८!! झोप घेणे आरोग्यिक दृष्टीने चांगले असते.
मार्गदर्शन - डॉ.एम.बी.पवार, विशेष सहकार्य प्रविणभाउ शिंपी ,नाशिक
Tags:
आरोग्य