येथील प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, संत महंतांची पुण्याई आणि प्राचीन ऐतिहासिक तसेच पौराणिक वारसा लाभलेल्या, व प्रत्येक बारा वर्षांनी येणाऱ्या महाकुंभ नगरीत कला-साहित्य क्षेत्रात नावलौकिक प्राप्त महाराष्ट्रातल्या
नासिक शहरात, येत्या 28 आणि 29 एप्रिल 2024 रोजी, Hotel Treat , मनोहर गार्डन, गोविंद नगर नाशिक येथे आपल्या सर्वांच्यासहकार्याने, यावर्षी देखील तिसरया राज्यव्यापी कर-परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
ᑎᗩՏIK : ᑎᖇᖇᑕ 2024 या कार्यक्रमाचे तिसऱ्यांदा आयोजन करीत आहोत. मागील 2 वर्षापासून आपल्या सर्वांच्या सहकार्याने व साक्षीने NRRC 2022 व 2023 टॅक्स का कुंभमेळा व टॅक्स का समृद्धी हायवे हे शीर्षक देऊन आपण दोन दिवसाचे यशस्वी सेमिनारचे आयोजन केले होते त्याचाच अनुभव पाठीशी घेऊन यावर्षी सुद्धा आम्ही सर्व नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व NRRC टीम व महाराष्ट्रातील गुड्स अँड सर्विस टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, व महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन, व नासिक टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन, सीएमए नाशिक ब्रांच, जळगाव डिस्ट्रिक्ट टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन, नगर डिस्ट्रिक्ट टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन, मालेगाव टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन, ठाणे टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन, व ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी सुद्धा
NRRC 2024 टॅक्स का रामायण
या शिर्षकाने परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. आम्हास सांगण्यास खरोखर आनंद होत आहे की किंवा अभिमान वाटतो की *NRRC 2024* संयुक्तिक रित्या भरवण्याचे नियोजन केल्यानंतर आम्ही आगाऊ बुकिंग करण्याचे ठरवले त्या अनुषंगाने आम्ही आगाऊ बुकिंग ला आपल्या राम लल्ला यांच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनेच्या दिवशी म्हणजेच 22 फेब्रुवारी 2024 या दिवसापासून सुरुवात केली व त्यास आगाऊ बुकिंगची शेवटची तारीख 25 मार्च2024 अशी ठरविण्यात आलेली होती व त्यानंतर बुकिंग बंद केली जाईल अशी आम्ही रोज व्हाट्सअप ग्रुप तर्फे आवाहन करीत होतो त्या आव्हानाला प्रतिसाद देत व मागील NRRC 2022 व NRRC 2023चे यशस्वीरित्या पार पाडल्याचे नियोजन असल्यामुळे आपल्या सर्वांच्या सहकार्याने 25 मार्च 2024 च्या आधी पूर्णतः 100% बुकिंग झालेली होती
मागील दोन वर्षापासून आपण आपल्या क्षेत्रातील विशेष व आपल्या कार्यक्षेत्र च्या व्यतिरिक्त समाजातील काही विशेष कार्य करीत असेल अशा आपल्या आदरणीय व्यक्तींना आपण जीवन गौरव पुरस्कार व इतर पुरस्कार देऊन सन्मानित करीत असतो.
आतापर्यंत आपण आपल्या नासिक टॅक्स प्रॅक्टिशनस असोसिएशनचे माजी अध्यक्ष एडवोकेट श्रीप्रकाशचंद्र सुराणा व मुंबई येथील एडवोकेट श्री विनायक जी पाटकर व सांगली येथील जेष्ठ एडवोकेट श्री किशोर लुल्ला यांना सुद्धा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले आहे
अगदि याच प्रकारे यावर्षी सुद्धा आमच्या आयोजक टीमने याचा पूर्ण अभ्यास करून जळगाव येथील जेष्ठ सनदी लेखापाल श्री मगन पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार व मुंबईचे प्रख्यात व ज्येष्ठ एडवोकेट श्री दीपक बापट यांना गुरुवर्य व पुणे येथील ज्येष्ठ कर सल्लागार श्री नरेंद्रजी सोनवणे यांना कृतज्ञता पुरस्कार व आपल्या सिन्नर येथील ज्येष्ठ कर सल्लागार श्री नंदकिशोर निराली यांना यशस्वी व्यावसायिक व उद्योजक पुरस्कार देऊन आपण सन्मानित करणार आहोत
या चौघेही आदरणीय व्यक्तींना आपापल्या कार्य क्षेत्रा च्या व्यतिरिक्त समाजात आपापल्या परीने आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे याचाच भाग म्हणून आपल्या नार्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन तर्फे या चौघेही आदरणीय व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते व आपल्या सर्वांच्या साक्षीने पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे
सदर सेमिनार यावर्षी सुद्धा आपण सबंध सेमिनार मराठी व हिंदी भाषेमधून घेणार आहे व यासाठी आपण महाराष्ट्रातील सर्व सीनियर व तज्ञ एडवोकेट व चार्टर्ड अकाउंटंट यांना आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी बोलावलेले आहे या वर्षाचे खास आकर्षण म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यातील बाहेरील दिल्ली येथील प्रख्यात वक्ते श्री विमल जैन व अमृतसर येथील आंचल कपूर व रोहित कपूर हे सुद्धा आपणास मार्गदर्शन करणार आहे या दोघेही दिवसाच्या कार्यक्रमाचे आपण निश्चितच फायदा करून घ्यावा ही मी आपणास आग्रहपूर्वक विनंती करतो
कुठलाही कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडायचा असल्यास एकट्याचे काम नसते मला हे काम पूर्ण करण्यासाठी *नासिक NRRC वर्किंग कमिटीने* खूपच मोलाची साथ दिली त्यांच्या सहकार्यानेच हा सेमिनार यशस्वीरित्या पार पडत आहे हे
या सेमिनारसाठी नासिकच्या व्यतिरिक्त जळगाव, धुळे, मालेगाव, नगर, सातारा, सांगली, हिंगोली, परभणी, रत्नागिरी, जालना, लातूर सिंधुदुर्ग मुंबई ठाणे, व पुणे, व या व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या बाहेरून सुरत व बडोदा इथून श्री मितेशजी मोदी व त्यांची सर्व टीम सह उपस्थित झाले अशा महाराष्ट्रातील व महाराष्ट्र बाहेरील सर्व दूर भागातून आलेले आमचे मित्र कर सल्लागार यांचे मी मनापासून आभार मानतो व धन्यवाद देतो, असेच प्रेम आमच्यावर असू द्या.
आपल्या सर्वांमुळे हा टॅक्स का रामायण आपण यशस्वी होणार असून सदर कॉन्फरन्स च्या आयोजक असलेल्या दहाई कर सल्लागार संस्थाच्या वतीने, मी आपले मनापासून स्वागत करतो
या ज्ञानाचा आपणा सर्वानाच मोठा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही.
या कॉन्फरन्स मध्येदोन दिवस चालणाऱ्या ज्ञानसत्रासोबतच, आपण आमच्या पाहुणचाराचा सुद्धा आनंद घ्यावा असे आवाहन अनिल चव्हाण ( अध्यक्ष नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन) यांनी केले आहे.
Tags:
अर्थविषयक