लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी नियुक्त अधिकारी – कर्मचारी यांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी EDC- Election duty Certificate - निवडणूक कार्य प्रमाणपत्राचे वाटप सूरू करणेत आले आहे. या कामकाजाची पहाणी सहा. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. गणेश मिसाळ व तहसिलदार श्री. प्रशांत कुलकर्णी यांनी तहसिल कार्यालय, नवापूर येथे केली व तातडीने वाटपाच्या सूचना दिल्या.
निवडणूक कार्यासाठी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर नियुक्त असलेल्या कर्मचा-यास त्या मतदान केंद्रावर मतदानासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देण्यात येते . तसेच जे कर्मचारी निवडणूक कार्यासाठी नियुक्त आहेत परंतु त्यांचे कर्तव्य प्रत्यक्ष मतदान केंद्रावर नाही असे कर्मचारी उदा. सेक्टर ऑफीसर इ. या कर्मचा-यांना त्यांचे नाव असलेल्या मतदान केंद्रावर जाणे शक्य नसल्याने त्यांना नजिकच्या मतदान केंद्रावर मतदानासाठी निवडणूक कार्य प्रमाणपत्र देण्यात येते.
मतदान केंद्राध्यक्षाकडे EDC घेऊन आलेले मतदाराकडे असलेले निवडणूक कार्य प्रमाणपत्रावर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची मुळ शाईची स्वाक्षरी आणि शिक्का आहे हे तपासून संबंधित कर्मचारी यांचेकडे EDC बरोबरच मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे ओळखीच्या 12 पुराव्यांपैकी एक पुरावा पाहून संबंधित मतदान केंद्राध्यक्ष अशा मतदारांना मतदान करणेबाबत पुढील कार्यवाही करतात.
्तहसिल कार्यालय, नवापूर येथे यासाठी श्री. स्वप्निल मुदलवाडकर मुख्याधिकारी नवापूर व श्री. रमेश चौरे गटशिक्षणाधिकारी नवापूर यांचे अधिपत्याखाली स्वतंत्र कक्ष स्थापित करणेत आला असुन निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्त अधिकारी – कर्मचारी ज्यांचे नाव नवापूर विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत आहे अशांसाठी निवडणूक कार्य प्रमाणपत्र वितरीत करणेत येत आहे. नवापूर वि.स.मसंघात 809 कर्मचारी यांचे नाव येथील विधानसभा मतदारसंघाच्या यादीत आहे तर जिल्ह्यातील इतर मतदारसंघातून तेथील सहा. निव़डणूक निर्णय अधिकारी यांचेकडून प्राप्त 424 निवडणूक कार्य प्रमाणपत्राचे वाटप करणेत येत आहे. तर नवापूर मतदारसंघातील 434 कर्मचारी ज्यांची नियुक्ती जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघात आहेत त्यांचेसाठी EDC वाटप देखील या ठिकाणी करणेत येत आहे.
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्री. गणेश मिसाळ यांनी निवडणूक कामकाजासाठी नियुक्त कर्मचारी यांना मतदानासाठी निवडणूक कार्य प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याचे मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
Tags:
शासकीय