नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाकडून नियुक्त जनरल ऑब्झरव्हर डॉक्टर विश्वनाथ आणि पोलिस ऑब्झरव्हर कुमार गौतम यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे अनुषंगाने प्रशासनाने केलेल्या तयारीचा नुकताच आढावा तहसील कार्यालय नवापूर येथे घेतला.
बैठकीचे वेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मिसाळ नवापूर विधानसभा मतदारसंघ तथा जिल्हा पुरवठा अधिकारी नंदुरबार यांनी निवडणुकीसाठी केलेल्या तयारीबाबत निवडणूक निरीक्षक यांना माहिती दिली.
यावेळी सर्व सेक्टर ऑफिसर, नवापूर पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे, विसरवाडी पोलिस निरीक्षक झोडगे , नंदुरबार उपनगर पोलीस निरीक्षक उपस्थित होते.
बैठकीचे वेळी डॉक्टर विश्वनाथ यांनी मतदान केंद्रावर किमान मूलभूत सुविधांचा आढावा घेतला. सर्व सेक्टर ऑफिसर यांनी ई.व्ही.एम कामकाजाची माहिती घ्यावी जेणेकरून मतदान पथकास अडचणी आल्यास त्वरित निराकरण करावे. मतदानाचे दिवशी मतदान केंद्रावर आलेले प्रसंग कुशलतेने हाताळावे, ज्या मतदान केंद्रांवर मागील निवडणुकीत कमी मतदान झाले होते त्या ठिकाणी मतदार जनजागृती कार्यक्रम घ्यावेत.
या निवडणुकीत नवापूर विधानसभा मतदारसंघाच्या मतदानाचे वेळी जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे अशा सूचना केल्या. सर्व अधिकारी भारत निवडणूक आयोगाच्या प्रति नियुक्तीवर आहेत त्यामुळे सरांनी आयोगाच्या निर्देशानुसार आपले काम मुदतीत आणि बिनचूक पूर्ण करावे.
पोलिस ऑब्झरव्हर कुमार गौतम यांनी सर्व नाकाबंदी कडक करावी, मतदानाचे दिवशी कायदा व सुव्यवस्था कुशलतेने हाताळावी, मतदानाचे दिवशी पोलीस सेक्टर अधिकारी फिरस्ती करून बंदोबस्ताचा आढावा घ्यावा अशा सूचना केल्या.
बैठकीत तहसीलदार प्रशांत कुलकर्णी, गट विकास अधिकारी देविदास देवरे, मुख्याधिकारी स्पनील मुदलवाडकर, गट शिक्षणाधिकारी चौरे नायब तहसिलदार सुरेखा जगताप, भक्तराज सोनवणे उपस्थित होते.
Tags:
निवडणूक