पालघर : ( सफाळे) सत्यप्रकाश न्युज
येथील पश्चिम रेल्वेत कार्यरत सीनियर सेक्शन इंजिनियर श्री राजेंद्र अहिरे व सौ ज्योती अहिरे (माध्यमिक शिक्षिका) यांचा मुलगा कु. चैतन्य राजेंद्र अहिरे याने नुकत्याच झालेल्या ICSE बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत Sir J. P. International School, Palghar येथून 92 % गुण प्राप्त करून आपले व आपल्या शाळेचे नाव रोशन केले आहे.
चि. चैतन्य यास शाळेच्या वर्ग शिक्षिका सौ. हर्षाली टीचर , मुख्याध्यापिका श्रीमती बिना मेनन मॅम , वोरा मॅम व इतर सहकारी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. कु.चैतन्य यास मिळालेल्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा प्राप्त होत आहेत.
Tags:
यश/निवड