नंदुरबार जिल्हाधिकारी पदि डॉ.मिताली शेठि यांची नियुक्ती, लवकरच स्वीकारणार कार्यभार

नंदुरबार सत्यप्रकाश न्यूज 
            येथील जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांची नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधीकरणच्या महानगर आयुक्तपदी बदली 9 आॅगष्ट रोजी झाली आहे. त्यांचा पदभार अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. गेल्या 17 दिवसांपासून नंदुरबार जिल्हा जिल्हाधिकार्‍यांच्या प्रतिक्षेत होता.दरम्यान, आज राज्य शासनाने राज्यातील आयएएस अधिकार्‍यांचे बदल्यांचे आदेश काढले. त्यात नंदुरबार जिल्हाधिकारीपदी नागपूर येथील वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) च्या संचालक डॉ.मिताली सेठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
    नंदुरबार जिल्हाला नवीन जिल्हाधिकारी मिळाल्याने नंदुरबार जिल्ह्यातील कामकाज सुरळीत सुरू होईल अशी अपेक्षा नागरिकांकडून होत असुन नवनियुक्त जिल्हाधिकारी आपला कार्यभार लवकरच स्वीकारणार आहेत.





Post a Comment

Previous Post Next Post