दिनांक-24/08/2024 रोजी दि. एन डी अँड एम वाय सार्वजनिक हायस्कूल व शेठ एच जे शहा कनिष्ठ महाविद्यालय, नवापूर येथे एलपीजी गॅस सुरक्षा संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक व व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती कमलबेन परिख होत्या व प्रमुख पाहुणे शाळेचे पर्यवेक्षक श्री फारुक पटेल होते. या कार्यक्रमात मंचावर ज्येष्ठ शिक्षक श्री के.एस. पाटील, श्री डी.पी. पाटील, श्री एन.पी.पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून सूर्या कंपनीचे विक्री प्रतिनिधी श्री संतोष सर होते व त्याच्या सोबत त्यांचे सहकारी सूर्या कंपनीचे श्री नितीन सर होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला आलेले प्रमुख वक्ते व त्यांचे सहकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. श्री संतोष सर यांनी घरात वापरात येणाऱ्या एलपीजी गॅसच्या सुरक्षित वापर करण्यासंबंधीत विविध उपाययोजना सांगितल्या. गॅस गळतीची विविध कारणे त्यांनी समजावून सांगितले. गॅस गळतीमुळे होणारे परिणामांची जाणीव त्यांनी करून दिली. त्यावर उपाय म्हणून सेफ्टी गॅस रेग्युलेटरचे महत्व त्यांनी सांगितले व सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्रीमती गीताबेन राजपूत यांनी सूत्रसंचालन केले व आभार प्रदर्शन श्री निलेश पाटील यांनी केले. या कार्यक्रमात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शाळेचे प्राचार्य श्री संजयकुमार जाधव सर, उपमुख्याध्यापिका श्रीमती कमलबेन परिख, पर्यवेक्षक श्री फारुक सर यांच्या मार्गदर्शनाने व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला.
Tags:
शैक्षणिक