अतिवृष्टीमुळे महामार्गावर वाहने बंद झाल्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी नवापूर पोलिसांचे प्रयत्न, नागरिकांना वाहने सांभाळून चालविण्याचे आवाहन

नवापूर सत्यप्रकाश न्युज 
   गेल्या काही दिवसांपासून नवापूर शहर व परिसरात प्रचंड पावसामुळे सुरत नागपूर 
महामार्गावर काही ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडले असून या मार्गावर 24 तास वाहन चालत असतात.
   एकिकडे महामार्गाचे ठप्प झालेले काम व प्रचंड  पावसामुळे महामार्गावर  चालणारी काहि  वाहने बंद पडले असून काही ठिकाणी पावसातील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना वाहन चालवताना अडचण निर्माण होत असल्याने महामार्गावरील वाहतूक संत गतीने चालू आहे. 
      सुरक्षिततेच्या उपाय म्हणून नवापूर पोलिसातर्फे वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न चालू आहे.  नागरिकांनी आपले वाहन सुरळीत चालविणे व कोणत्याहि प्रकारची घाई न करता वाहन चालविणे व सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्न करुन 
 सहकार्य करण्याचे आवाहन नवापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत व कर्मचाऱ्यांनी केले आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post